लेक लाडकी योजना अर्ज सुरू,पात्रता ,कागदपत्रे ,अटी व शर्ती | Lek Ladki Yojana Online Apply

Lek Ladki Yojana Online Apply :- 

राज्यात मुलींचा जन्मदर वाढविणे त्याच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबविले जातात पहिली योजना दिनांक ०१ ऑगस्ट २०१७ ला सुरू झाली माझी कन्या भाग्यश्री  योजना ,पण शासनाचे या योजना ला राज्यातील जनतेचा योग्य प्रतिसाद मिळाला नाही .मुलींच्या हितासाठी सन २०२३-२४अर्थसंकल्पीय भाषणामध्ये “मुलींच्या साक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात येईल महाराष्ट्रातील पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर टप्या टप्यामध्ये अनुदान देण्यात येईल लाभार्थी मुलींचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रु रोख देण्यात अशी घोषणा करण्यात आली .Lek Ladaki PDF Form 

लेक लाडकी योजनेत किती मिळणार अनुदान :- 

  • महाराष्ट्रातील पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुंटूबातील मुलींना मिळणार लाभ फक्त
  • मुलीच्या जन्मानंतर ५००० रुपये मिळणार
  • इयता पहिली गेल्या नंतर ६०००रु
  • सहावीत ७०००रु
  • ११ वी गेल्यानंतर ८००० रु
  • लाभार्थी मुलींचे १८ वर्ष पूर्ण झाल्यावर ७५००० रुपये रोख स्वरुपात मिळणार

असे एकूण लाभार्थी मुलीला १०१००० रुपये (१ लाख १ हजार रुपये )मिळणार .

Lek Ladaki Yojana आवश्यक कागदपत्रे :-

  • लाभार्थी मुलींचा जन्म दाखला
  • लाभार्थी कुंटुंबांचे उत्पन्न प्रमाणपत्र (१ लाख रु पेक्षा कमी )
  • आई-वडिलांचे आधार कार्ड
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • शिधापत्रिका कार्ड (पिवळा व केशरी रेशन कार्ड)
  • लाभार्थी मुलगी १८ वर्षे झाल्यानंतर शाळेत शिकत असल्याबाबतचा दाखला (प्रवेश निर्गम दाखला )
  • कुंटूब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र
  • अंतिम लाभार्थी करता मुलीचा विवाह झाल्या नसल्याचे स्वयघोषणापत्र

योजना Lek Ladki २०२३ ची पात्रता :- 

  • महाराष्ट रहिवाशी असावा
  • पिवळा व केशरी शिधापत्रिका धारक कुंटुंबातील असावा
  • लाभार्थी कुंटुंब प्रमुखाचे उत्पन्न १ लाख रु.पेक्षा जास्त नसावे .
  • महाराष्ट्रातील कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडावे लागेल .
  • लेख लाडकी योजना १ एप्रिल २०२३ नंतर जन्म झालेल्या अथवा दोन जुळ्या मुलींना लाभ मिळणार
  • लाभार्थी प्रामुखास दुसर्‍या आपत्यानंतर किंवा दुसर्‍या डिलिव्हरीच्या वेळेस जुळी झाल्यास कुंटूब शस्त्रक्रिया करावे लागेल .

लेक लाडकी योजनेचा अर्ज कोठे करावे ? 

 

राज्य शासनाच्या या नवीन योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला जवळच्या अंगणवाडीमध्ये अर्ज भरून द्यावे लागेल .त्यानंतर योग्य ते कार्यवाही झाल्यानंतर मुलींच्या बँक खातेत पैसे येण्यास सुरू होतील किंवा पैसे लाभार्थी मुलींच्या आई-वडिल पैकी एकच्या बँक खातेत्त जमा होतील .

मित्रांनो या योजना संदर्भात सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून फॉर्म व  शासन GR वाचा .

 

 

लेक लाडकी योजन

शासन GR फॉर्म डाउनलोड 

👉येथे  क्लिक करा👈

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top