लाडकी बहीण योजना बोगस लाभार्थीवर होणार गुन्हे दाखल Ladki Bahin Yojana Bogas Labharthi

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना :-
नमस्कार मित्रांनो, राज्य शासनाचा महत्वपूर्ण योजना म्हणजे ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील महिलांना लाभ मिळत आहे.आत्तापर्यंत २ कोटी ४० लाख महिलांनी नोंदणी केली असून त्यामधील १ कोटी ८७ लाख पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे. उर्वरित अर्जांची पडताळणी करून त्यांनाही लवकर निधी उपलब्ध करून देण्यात येणार.Ladki Bahin Yojana labharthi List
बँक कपात थांबणार :-
मुख्यमंत्री लाडकी पण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यात येत आहे.या लाभातून काही बँकांकडून मिनिमम बॅलन्स, इसीएस मॅडेट रिटर्न, चेक रिटर्न यासारखे शुल्क आकारून महिलांच्या बँक खात्यातील लाभाची रक्कम कपात करून घेतली जात आहे अशा बँकांवर कारवाई करण्यात येणार अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे. यामुळे योजनेचे संपूर्ण रक्कम मिळणार .
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पैसे नाही आले,विशेष मोहीम :-
राज्यातील काही पात्र महिलांच्या बँक खाता आधार शेडिंग नसल्याने लाभ मिळत नाही.याबाबत अंगणवाडी सेविका,मदतनीस,यांच्या मदतीने २ ते ७ ऑक्टोबर या कालावधीत विशेष मोहीम राबवली जाणार आहे बँकेची संबंधित अडचणी संदर्भात स्थानिक पातळीवर बैठकी घेऊन सर्व लाभार्थी महिलांचे समस्याचे निरसन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.Ladki Bahin Yojana list
बोगस लाभार्थी गुन्हे दाखल :-
राज्यातील नांदेड व सातारा जिल्ह्यात झालेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बोगस लाभार्थी संदर्भात शासनाकडून कठोर कारवाई केली जाणार आहे.नांदेड जिल्ह्यामध्ये प्रत्यक्षात अर्ज महिलेचे भरले भरून त्याला पुरुषाचे आधार क्रमांक दिल्याने पुरुषाच्या खात्यावर पैसे जमा झाले याबाबत शासनाकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर ना त्यांच्यावर आता फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार तसेच ज्या केंद्र चालकांनी हा फॉर्म भरला त्याच्याविरुद्ध तेही गुन्हे दाखल केले जाणार.Ladki Bahin Yojana
राज्यातील ज्या महिलांचे आतापर्यंत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे प्राप्त झाले नाहीत अशाने २ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीमध्ये आपल्या जवळील अंगणवाडी येथे राबविले जाणारा विशेष मोहिमेमध्ये आपली तक्रार ची नोंद करावी.