लाडकी बहीण योजनेचे नियम बदलले हे कागदपत्रे तयार ठेवा ! Ladaki Bahin Yojana Update Rules 2024

Mukhyanmantri Ladki Bahin Yojana Maharashtra :-

नमस्कार मित्रांनो,राज्यात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चर्चा जोरदार चालू आहे ,योजनेचा GR आल्यापासून त्यामध्ये काहींना काही बदल होत आहेत .GR मध्ये नमूद काही अटी रद्द करण्यात आले आहे. ते कोणते ? नेमके कागदपत्रे कोणती लागतात या संदर्भात संपूर्ण माहिती या लेखात पाहणार आहोत तरी पोस्ट संपूर्ण वाचा या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देणार आहे .योजना जाहीर केल्यानंतर पात्र महिलांना करिता कागदपत्रे काही अटी ठेवण्यात आल्या होत्या .मुख्याता उत्पन्न दाखला व तहसिल कार्यालयातील डोमिसाल (रहिवाशी )दाखला काढण्यासाठी महा-ई-सेवा ,सेतू या ठिकाणी मोठी गर्दी पाह्यला मिळत होता .आणि अर्जची अंतिम तारीख हे अगोदर १५ जुलै २०२४ जाहीर केल्याने लाभार्थीची अधिकच धावपळ सुरू होती .

Ladaki Bahin Yojana Update Rules 2024 : 

GR मधील नियम व अटीबाबत राज्य सरकारने लाभार्थी महिनांसाठी कागदपत्रामध्ये शिथिलता दिली आहे.लाभार्थी महिलांना अगोदर नियमाप्रमाणे डोमिसाल (रहिवाशी )दाखला आवश्यकता होती आता या ठिकाणी १५ वर्षापूर्वीचं रेशन कार्ड ,मतदान ओळखपत्र ,शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला या पैकी एक जरी कागदपत्र असेलतर या योजनेचा लाभ घेता येणार आहे .योजनेची अर्ज करण्याची कालावधी वाढवण्यात आली असून शेवटची तारीख हे ३१ऑगस्ट २०२४ आहे . 

नेमक्या अटी काय काय ? नवीन घोषणा कोणते ? :- 

  1. सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत ही १ जुलै २०२४ ते १५ जुलै २०२४ पर्यत ठेवण्यात आली होती .आता यामध्ये सुधारणा करून ते २ महिन्याचे वाढवण्यात आले आहे शेवटची तारीख ३१ऑगस्ट २०२४ आहे .शेवटच्या तारखे पर्यन्त अर्ज करणार्‍या पात्र लाभार्थी महिलांना योजनेचा लाभ हे १ जुलै २०२४ पासूनचं दर माह १५०० आर्थिक लाभ देण्यात आहे . 
  2. या योजनेच्या पात्रतेमध्ये आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते.आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी आता १५ वर्षा पूर्वीचे १)रेशन कार्ड २)मतदार ओळखपत्र ३)शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ४)जन्म दाखला  या ०४ पैकी कोणतेही ओळखपत्र /प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहेत .
  3. सदर योजनेतून ०५ एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे .
  4. सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट २१ ते ६० वर्ष वयोगट एवजी २१ ते ६५ वर्ष वयोगट करण्यात येत आहे .
  5. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणार्‍या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्याच्या पतीचे १)जन्म दाखला २)शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ३)आधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार .
  6. रु .२.५ लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्न दाखला प्रमाणपत्र सूट देण्यात येत आहे .
  7. सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहीत महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे .majhi ladki bahin yojana online apply
लाडकी बहीण योजना लागणारे मुख्य कागदपत्रे : – 
  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • बँक पासबूक
  • डोमिसाल (रहिवाशी )दाखला नसेल तर १५ वर्षा पूर्वीचे १)रेशन कार्ड २)मतदार ओळखपत्र ३)शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ४)जन्म दाखला  या ०४ पैकी कोणतेही एक आवश्यक .
  • परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणार्‍या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्याच्या पतीचे १)जन्म दाखला २)शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ३)आधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार .
  • उत्पन्न दाखला हे फक्त पिवळे व केशरी कार्ड धारकांना सूट आहे .

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *