Kusum Solar Yojana Online Apply 2023 : –
नमस्कार शेतकरी मित्रांनो ,Kusum Solar Yojana दिनांक १७ मे २०२३ पासून प्रधानमंत्री कुसुम सोलार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत.शेतकर्यांनी अधिकृत या https://www.mahaurja.com/meda/ संकेतस्थळ वरती अर्ज करता येणार आहे.
Kusum Solar Yojana Mahaurja : –
प्रधानमंत्री कुसुम सोलर योजनेसाठी अर्ज करताना शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. यावेळी हे विशिष्ट कोटा उपलब्ध असे पर्यंत ऑनलाइन पद्धतीने लिंक सुरू असणार त्यामुळे ऑनलाइन सेवा केंद्रावर शेतकऱ्यांची खूप मोठी गर्दी होत आहे. शक्य होईल तेवढे लवकर शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावा.
शेतकरी मित्रांनो अर्ज करण्यासाठी शासनाने https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B ही अधिकृत लिंक उपलब्ध करून दिलेली आहे.
Kusum Solar Yojana :-
योजनेच्या लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रथमता या लिंक वरती आपली नोंदणी करावी लागेल नोंदी करण्यासाठी,आपल्याकडे मोबाईल क्रमांक व आधार कार्ड असणे आवश्यक आहे.नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १०० रुपये ऑनलाईन शुल्क भरावे लागणार.प्रधानमंत्री कुसुम सोलर योजना-२ चा अर्ज शेतकरी स्वतः आपल्या मोबाईल वरूनही भरू शकता किंवाजवळच्या आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन ही अर्ज भरू शकता.(kusum solar registration)
टीप :- अर्ज भरताना सर्व माहिती बरोबर आहे का ? याची खातर जमा करूनच फॉर्म सबमिट करावे, एकदा फॉर्म सबमिट केल्यानंतर पुन्हा दुरुस्त करता येत नाही.
सोलर योजनेचा फॉर्म मोबाईल वरून असं भरा :- भाग नंबर ०१
{Mahaurja Solar Pump Apply online}
-
- प्रथमता मोबाईल मध्ये अधिकृत संकेतस्थळ ओपन करा.kusum mahaurja solar register
- त्या ठिकाणी तुम्हाला Safe Village List लिस्ट हा पर्याय दिसेल,त्यावर क्लिक करून आपले गावचे नाव यादीत आहे का ? हे पहा !
- शेतकरी मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या, यादीमध्ये आपल्या गावचे नाव असेल तर आपण डिझेल पंप यूजर (Diesel Pump User) या पर्यायांमध्ये NO हा पर्याय निवडू शकता .परंतु यादी मध्ये नाव नसेल तर त्या ठिकाणी YES पर्याय निवडून अर्ज करू शकता.
- आधार क्रमांक ,जिल्हा ,तालुका ,गाव ,मोबाईल नंबर, आणि कास्ट कॅटेगिरी (Cast Category) मध्ये जात प्रवर्ग निवडून Payment for online Application या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर दिलेल्या पेमेंट ऑप्शनच्या माध्यमातून १०० रुपये शुल्क भरा.
- शुल्क भरत असताना Shipping ची माहिती व्यवस्थित भरावी.
- शुल्क होत असताना कधीही रिफ्रेश बटनावर क्लिक करू नका.
- शुल्क भरल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल.
- आपल्या जिल्ह्यात किती कोटा उपलब्ध आहे याची माहिती दिसेल.
- Proceed वर क्लिक करा,त्यानंतर नवीन पेज उघडेल त्या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड नंबर ,जिल्हा ,तालुका, गाव ,निवडून शेतीचा गट नंबर, टाकायचा आहे .त्यानंतर आपले गाव निवडायचे आहे इतर माहिती भरून Submit Application वर क्लिक करा .
- त्यानंतर आपल्या मोबाईल क्रमांक वरती Otp येईल तो टाका ,नंतर रजिस्टर मोबाईल वरती युजरनेम पासवर्ड मिळेल तो नोंद करून ठेवा .
Mahaurja Beneficiary Login : –
भाग नंबर ०२
- User id And Password मिळाल्यानंतर खलील संकेतस्थळ क्लिक करून ओपन करा .
- https://kusum.mahaurja.com/beneficiary/
- या ठिकाणी युजरनेम पासवर्ड टाकून लॉगिन इन करा.
- शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एकूण महत्वाचे ०८ स्टेप मध्ये माहिती भरावे लागणार .
- त्यामधील पहिले दोन स्टेप मध्ये कोणतेही बदल करता येणार नाही.
- नवीन किंवा बदली डिझेल पंपाची विनंती.
- अर्जदाराची वैयक्तिक माहिती व जमीन विषयक माहिती भरावी.
- अर्जदाराचा निवासी पत्ता. solar pump registration online
- आपल्याकडील जलस्तोत्र कोणता ? यांची माहिती
- शेती पिकाची माहिती.
- किती HP पंपाची आपल्याला आवश्यकता आहे.
- बँकेची माहिती.
- आवश्यक ते कागदपत्रे अपलोड करा.
सर्वात शेवटी कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर अटी व शर्ती या चौकोनात टिकमार्क करा .त्यानंतर सबमिट वरती क्लिक करा .अशा पद्धतीने आपला अर्ज यशस्वी रित्या Submit होऊन जाईल.
प्रधानमंत्री कुसुम सोलर योजना टप्पा -०२ चा ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा भरायचा याबद्दलची माहिती तुम्हाला आवडला .
असेल तर इतर शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद !