खरीप हंगाम २०२५ ई-पीक पाहणीस शेवटची मुदतवाढ ,Kharip E-Pik Pahani 2025

खरीप हंगाम २०२५ ई-पीक पाहणी:-

नमस्कार शेतकरी मित्रांनो,खरीप हंगाम २०२५ करिता शेतकरी स्तरावर ई-पीक पाहणी करण्यास मोबाईल App,उपलब्ध करून देण्यात आला आहे.सुरूवातीला खरीप हंगाम २०२५ करिता ०१ऑगस्ट २०२५ ते १४ सप्टेंबर २०२५ हे कालावधी देण्यात आले होते,पण राज्यात होत असलेल्या अतिवृष्टी आणि पुर परिस्थिती मुळे अनेक शेतकर्‍यांना हे खरीप ई-पीक पाहणी करणे झालं नाही.महाराष्टात काही ठिकाणी दुबार पेरणी ही झाले अश्या एक ना अनेक कारणाने राज्यातील शेतकर्‍यांना मोबाईल App मध्ये ई-पीक पाहणी करणे शक्य नाही.e pik pahani2025

Kharip E-Pik Pahani 2025:-

शासनाच्या धोरणानुसार राज्यातील सर्व शेतकर्‍याचे खरीप ई-पीक पाहणी व्हावे,या पासून कोणीही वंचित राहू नये याकरिता शेतकरी स्तरावरून पीक नोंदणीसाठी १४ सप्टेबर २०२५ नंतर सहा दिवसाचं मुदतवाढ देण्यात आली होती २० सप्टेंबर २०२५ अंतिम मुदत होत,त्यानंतर उर्वरित शेतकर्‍यांना २१ सप्टेंबर २०२५ ते ३० सप्टेंबर २०२५ हे शेवटची निश्चित करण्यात आला आहे.

३० सप्टेंबर २०२५ नंतर नोव्होबर २०२५ पर्यन्त या कालावधीत साहायक स्तरावरून चेक करण्याचं काम पूर्ण केलं जाणार आहे.तरी शेतकरी मित्रांनो आजुन कोणी ई-पीक पाहणी केली नाही त्यांनी करून घ्या.या वर्षी सर्वत्र खूप पासून होत आहे किमान शासनाच्या माध्यमातून होणार पीक पंचनामा लाभ तरी घेता येईल.

ई-पीक पाहणी का करायची :-

  • नैसर्गिक आपत्ती मदतीसाठी
  • अचूक व वस्तुनिष्ठ पीक पेरणीची माहिती मिळण्यासाठी
  • पीकविमा योजना साठी पीक पेरा माहिती
  • कृषि विभागाच्या विविध योजना लाभासाठी
  • पीक कर्जसाठी महत्वाचे
  • जमिनीच्या अचूक मूल्यांकनसाठी पीक पेरा
  • वन्य प्राणी पीक नुकसान मदतीसाठी पीक पेरा
ई-पीक पाहणी नोंदविता येणार्‍या बाबी :-
  • शेतातील अचूक पिकाची माहिती
  • शेडनेट पीक माहिती
  • पड जमीन माहिती (घरपड/गवतपड )
  • जलसिंचन सावध व प्रकार (विहीर,बोअरवेल,शेततळे)
  • बांधावरील झाडांची माहिती
  •  निर्भेळ पीक/मिश्र पीक माहिती

हा पोस्ट जर आवडलं असेल तर मित्रांना शेअर करा .

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *