खरीप ई-पीक पाहणी २०२४ | Kharip E-Pik Pahani 2024

E-Pik Pahani २०२४ :-

नमस्कार मित्रांनो ,डिजिटल युगात आता प्रत्येक माहिती ऑनलाइन उपलब्ध आहे त्यामध्ये शेती संदर्भात बर्‍याचं गोष्टी असून  त्यामधील सर्वात महत्वाचे म्हणजे ई-पीक पाहणी होय राज्यातील उन्हाळी प्रत्येक पिकांची नोंद ऑनलाइन व्हावी या करिता गुगल प्लेस्टोअरवर १५ एप्रिल २०२४ पासून E-Pik Pahani २०२४ नवीन व्हर्जन उपलब्ध झाला आहे .

पिकांची नोंदीसाठी केंद्रसरकार कडून ‘डिजिटल पीक सर्वेक्षण केली जाणार त्यासाठी देशातील एकूण ६ राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रचा समावेश आहे राज्यात १५एप्रिल पासून पथदर्शी स्वरुपात “डिजिटल क्रॉप सर्वेक्षण ” राबविण्यास सुरुवात त्यामध्ये प्रत्येक जिल्हातील एक तालुका असे एकूण ३४ तालुक्यातील ३०३२ गावांची निवड करण्यात आली आहे .

आता पर्यतं  ई-पीक पाहणी या मोबाइल अॅप  पीक पाहणी केली जात होती बदलत्या युगा बरोबर सर्व काही मोबाइल वर ऑनलाइन उपलब्ध आहे यांची सुरुवात महाराष्ट्रात १५ ऑगस्ट २०२१ संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला.हे मोबाइल अॅप सुरू केल्यापासून दोन कोटी पेक्षा जास्त शेतकर्‍यांनी या वरती नोंदणी केले आहे केंद्रीय कृषि मंत्रालय खरीप हंगाम २०२३ पासून डिजिटल क्रॉप सर्‍व्हेचा DCS पथदर्शी प्रकल्प राबविला आहे .या उन्हाळी खरीप पिकांची नोंद याच्या माध्यमातून केली जाणार आहे

डिजिटल क्रॉप सर्व्हे :- 

याच्या माध्यमातून पीक पाहणी नोंद या पीक विमा ,पीक विमा दावे निकाली काढणे ,शेती पीक कर्ज वाटप ,नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांची नुकसान झाल्यास अचूक भरपाई देण्यासाठी आवश्यक .हे मोबाइल App डाऊनलोड केल्यावर प्रथम नोंदणी करावी लागेल त्यानंतर गांव आणि गट क्रमांक निवडावा लागेल , पुढे पिकांची फोटो इतर आवश्यक माहिती भरावी लागेल .

शेतकर्‍यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कडून विविध योजना राबविल्या जातात त्यामध्ये अनुदान ,पीकविमा ,नुकसान भरपाई इत्यादीचा समावेश आहे .देशातील काही राज्यात आजून शेती पिकांची ऑनलाइन अध्यावत नाही त्यामुळे तेथील शेतकर्‍यांना शासनाकडून अनुदान ,पीक विमा ,नुकसान भरपाई देण्यास विलंब होतो म्हणून शेतकरी मित्रांनो आपल्या शेती पिकांची माहिती ऑनलाइन करा .

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top