ज्वारी पेरणी करताय मग हेच घ्या टॉप ८ सुधारित वाण | Jowar Seed Information In Marathi
ज्वारी पेरणी करताय मग “हे ” टॉप ८ सुधारित वाण | Jowar Seed Information In Marathi
नमस्कार मित्रांनो,
Mhsheti.com या संकेत स्थळावर आपलं स्वागत आहे. महाराष्ट्रात पिकवला जाणारा तृणधान्य पिका पैकी हा ज्वारी एक पीक आहे महाराष्ट्राची भाकरी महाराष्ट्राबरोबरच देशात ही प्रसिद्ध आहे. ज्वारीचे उत्पादन आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घेतले जाते रब्बी हंगामात येणारा हा ज्वारी महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी आपल्या जमिनीमध्ये पेरणी करत असतो.
यावर्षीच्या खरीप पिकाचे उत्पादन काही ठिकाणी कमी प्रमाणात झाला असून तर काही ठिकाणी खरीप पिकांमधील उडीद पिकाचे उत्पादन चांगले झाले आहे. पण उडीद पिकाच्या नादामध्ये शेतकऱ्यांचे रब्बीची पेरणी पुढे जात आहे खरीप हंगामामध्ये अवेळी आलेल्या पावसामुळे पिकाचे तर नुकसान
झालेच त्याच बरोबर संपूर्ण जमीन तण झालं आहे .त्यामुळे शेतकऱ्यांना आता रब्बीची पेरणी करताना प्रथम तण काढावे लागणार आहे तण काढून काही शेतकरी आता रब्बीचे पेरणीला सुरुवात केलेले आहेत.
ज्वारी पेरणी :
महाराष्ट्र शासन कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील बियाणे खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते .अनुदान देण्याचे मागचा उद्देश
शेतकरी पारंपरिक पद्धतीने बियाणे घेऊन न पेरणी करता आधुनिक सुधारित पद्धतीचे बियाणे खरेदी करावे.
आणि त्यापासून मिळणारा उत्पादन जास्त प्रमाणात मिळावे हा उद्देश महाराष्ट्र शासन कृषी विभागाचा आहे.महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित,
अकोला यांच्यामार्फत रब्बी हंगामातील सुधारित ज्वारी पिकाचे वाणाची माहिती आजच्या या लेखात आम्ही पाहणार आहोत तरी हा लेख पूर्ण वाचा.
योग्य वाणाची निवड :
शेतकरी मित्रांनो महाराष्ट्राचा अजूनही पेरणी करण्यासाठी पूर्वीचे बियाणे वापरले जातात परिणामी त्याचा उत्पन्न ही शेतकऱ्यांना
कमी प्रमाणात मिळतो.ज्वारी या पिकाचे आपल्या जमिनीला योग्य ते वाणाची निवड जर केलात तर नक्कीच ज्वारी या कोरडवाहू पिकापासून आपल्याला चांगले उत्पन्न मिळू शकते.बऱ्याच शेतकऱ्यांना नेमके कोणत्या वाणाची निवड करावी या संभ्रमावस्थेत असतात पण हा लेख वाचल्यानंतर ना तुमचा जमीन कोणत्या वाणा साठी योग्य आहे .हे लक्षात येईल मग तोच वाणा ख*रे*दी करून तुम्ही ज्वारी पेरणी करा नक्कीच तुमचे उत्पादन जास्त येईल.
ज्वारी पिकाचे टॉप ८ सुधारित वाण : Jowar Seed Variety In Maharashtra
१) मालदांडी ३५-१ (एम-३५-१)
- प्रसारण वर्ष – एसओ (ई) सन 1984
- लागवडी करिता शिफारस– रब्बी हंगामात महाराष्ट्र, कर्नाटक, व आंध्र प्रदेशातील, दख्खनच्या पठाराने मध्ये या वाणाची पेरणी करता येते.
- जमिनीचा प्रकार- मध्यम
- कालावधी-१२५ ते १३५ दिवस
- वाणाचे गुणधर्म- उंची १८०-२०० सेंटीमीटर कणीस घट्ट व अंड्याच्या आकाराचे, दाण्याचा रंग मोत्यासारखा पांढरा, व दाणा टपोरा.
- रोग प्रतिकार क्षमता- खडखड्या रोगास सहनशील
- कीड प्रतिकारक्षमता- खोडमाशी या किडी सहनशील
- सरासरी उत्पादन- प्रति हेक्टरी २० ते २५ क्विंटल इतके असणार.
२) परभणी मोती पीव्हीआर-३९६ (एस पी व्ही १४११ ) :
- प्रसारित वर्ष- सन २००२
- लागवडी करिता शिफारस- महाराष्ट्रात रब्बी हंगामात, बागायती व कोरडवाहू क्षेत्राकरिता
- जमिनीचा प्रकार- मध्यम व भारी प्रकारची जमीन
- कालावधी- एकूण दिवस १२६ते १२९
- वाणाचे गुणधर्म- या ज्वारी ची उंची १९०-२०० सेंटी मीटर इतके, कणीस मध्यम घट्ट लांबट टोकाकडे बोथट, दाण्याचा रंग मोत्यासारखा पांढरा चकाकणारा असणार.
- सरासरी उत्पादन- या वाणाची कोरडवाहू उत्पन्न प्रति हेक्टरी १७ क्विंटल, तर बागायती क्षेत्रासाठी प्रति एकरी ३२ क्विंटल इतके उत्पादन मिळते .
३) फुले रेवती आरएसव्ही-१००६ (एसपीव्ही) १८३० :
- प्रसारण वर्ष -२००९
- लागवडी करिता शिफारस– बागायती क्षेत्राकरिता रब्बी हंगामात
- जमिनीचा प्रकार– मध्यम व भारी
- कालावधी-११८ते १२० दिवस
- वाणाचे गुणधर्म- या वाणाची ज्वारी उंची २२०-२४० सेंटी मीटर इतके असते कणीस मध्यम व घट्ट, सम प्रमाण असलेल्या आकाराचे, केसाळ दाण्याचा रंग मोत्यासारखा पांढरा
- रोग प्रतिकार क्षमता- खडखड्या रोगास सहनशील
- कीड प्रतिकारक्षमता- खोडमाशी या किडा सहनशील
- सरासरी उत्पादन- प्रति हेक्टरी ४० ते ४५ क्विंटल इतके आहे.
४) फुले वसुधा आरएसव्ही-४२३ ( एसपीव्ही-१७०४)
- प्रसारण वर्ष –२००७
- लागवडी करिता शिफारस– महाराष्ट्रातील कमी पावसाच्या व हमखास पावसाच्या प्रदेशात करिता रब्बी हंगामात या वाणाची शिफारस केली आहे
- जमिनीचा प्रकार– भारी प्रकारची जमीन
- कालावधी-११६-१२० दिवस
- वाणाचे गुणधर्म- कणीस माध्यम व घट्ट , वरवंटा च्या आकाराचे, केसाळ दाण्याचा रंग मोत्यासारखा पांढरा
- रोग प्रतिकार क्षमता- खडखड्या रोगास सहनशील
- कीड प्रतिकारक्षमता- खोड मासी पासून संरक्षण
- सरासरी उत्पादन- प्रति हेक्टरी कोरडवाहू जमिनीसाठी २५-२८ क्विंटल, बागायतीसाठी ३०-३५ क्विंटल उत्पादन मिळते
५) पीकेव्ही क्रांती एकेएसव्ही -१३ आर :
- प्रसारण वर्ष –२००४
- लागवडी करिता शिफारस- रब्बी हंगामातील महाराष्ट्र बागायती व कोरडवाहू क्षेत्रकरिता
- जमिनीचा प्रकार- भारी
- कालावधी-१२०-१२२ दिवस
- वाणाचे गुणधर्म- या ज्वारी चे ऊंची २३५-२४० से.मी कणीस मध्यम घट्ट ,अंड्याच्या उलट आकाराचे ,दाण्याचा रंग ,मोत्यासारखा पांढरा
- रोग प्रतिकार क्षमता- पानावरील करपा या रोगास किडीस सहनशील
- कीड प्रतिकारक्षमता- खोडमाशी व खोडकिडा या किडीस सहनशील
- सरासरी उत्पादन- प्रती हेक्टर कोरडवाहू २४-२५ क्विंटल, बागायती जमिनीसाठी ३३-३४ क्विंटल इतके उत्पन्न मिळते.
६) फुले चित्रा आरएसव्ही-२३७ ( एसपीव्ही-१५४६)
- प्रसारण वर्ष –२००६
- लागवडी करिता शिफारस- पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा विभागाकरिता कमी पावसाच्या क्षेत्रास रब्बी हंगामात
- जमिनीचा प्रकार- मध्यम
- कालावधी-११८-१२२ दिवस
- वाणाचे गुणधर्म- या ज्वारीची उंची २००-२२० सेंटी मीटर इतकी असते कणीस मध्यम घट्ट , आकार अंड्या सारखा, केशाळ दाण्याचा रंग मोत्यासारखा पांढरा चकाकणारा.
- रोग प्रतिकार क्षमता- खडखड्या रोगास सहनशील करते
- कीड प्रतिकारक्षमता- खोडमाशी या किडस सहन करते
- सरासरी उत्पादन- प्रति हेक्टरी उत्पन्न ३०-३२ क्विंटल मिळते
७) फुले सुचित्रा आरएसव्ही-१०९८ ( एसपीव्ही-२०४८)
- प्रसारण वर्ष -२०१२
- लागवडी करिता शिफारस- पश्चिम महाराष्ट्रातील रब्बी क्षेत्राकरिता
- जमिनीचा प्रकार- मध्यम
- कालावधी-१२०-१२५ दिवस
- वाणाचे गुणधर्म- कणीस मध्यम आकाराचा घट्ट, घंटा सारख्या आकाराचा, केसा दाण्याचा रंग मोत्यासारखा पांढरा.
- रोग प्रतिकार क्षमता- तांबेरा व पानावरील करपा रोगास सहनशील करते
- कीड प्रतिकारक्षमता- खोडमाशी व खोडकिडा या किडीस सहनशील
- सरासरी उत्पादन- या वाणाची प्रति हेक्टरी उत्पादन कोरडवाहू क्षेत्रासाठी २०-२५ क्विंटल मिळते.
८) फुले अनुराधा आरएसव्ही-४५८ ( एसपीव्ही-१७०९)
- प्रसारण वर्ष -२००८
- लागवडी करिता शिफारस- पश्चिम महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण क्षेत्राकरिता रब्बी हंगामासाठी
- जमिनीचा प्रकार- हलकी
- कालावधी-१०५-११० दिवस
- वाणाचे गुणधर्म- कणीस मध्यम आकाराचा घट्ट, अंड्याच्या आकाराच्या केसाळ दाण्याचा रंग मोत्यासारखा.
- रोग प्रतिकार क्षमता- खडखड्या रोगास सहनशील करते
- कीड प्रतिकारक्षमता- खोडमाशी व खोड किडा यास सहनशील
- सरासरी उत्पादन- या वाणाची प्रति हेक्टरी उत्पादन १० ते १२ क्विंटल मिळते.
ट्रॅक्टरच्या साह्याने ज्वारी पेरणी यंत्राची सेटिंग बाबत संपूर्ण माहिती साठी खालील विडिओ नक्की बघा :
शेतकरी मित्रांनो हे सर्व ज्वारीचे वाण रब्बी हंगामात १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोंबर पर्यंत पेरणी करावे .
या ज्वारीची पेरणी तिफणीने किंवा ट्रॅक्टरच्या साह्याने पेरणी करू शकता २ ज्वारीच्या रोपांमधील अंतर कोरडवाहू ४५ *१५ सेंटीमीटर तर बागायतीसाठी ४५*१२ सेंटी मीटर इतके अंतर असावे याची काळजी घ्या. ज्वारी पेरणी करताना आपले ज्वारीचे बियाणे जमिनीचा ती खोल जाणार नाही याची दक्षता घ्या ज्वारीचे बियाणे जमिनीमध्ये ५ सेंटी मीटर इतके खोलवर जातील एवढेच पेरणी यंत्राचे सेटिंग करा वरील वाणाचे तुम्ही जर पेरणी करत असाल प्रति हेक्टरी १० किलो बियाणे पडले पाहिजेत. पेरणी करताना जे आपण खत निवड तोय त्या खतांमध्ये नत्र ,स्फुरद, पालाश, या तिन्ही घटकांचा समावेश असलेल्या खत पेरणी करावे. वरील सर्व माहिती महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित अकोला यांच्या रब्बी सुधारित ज्वारी पिकाच्या विविध वाणांच्या लागवडीबाबत व गुणधर्माविषयी संक्षिप्त माहिती यात त्याच्या साह्याने हा लेख लिहिलं आहे. हा महत्त्वपूर्ण लेख तुम्ही वेळ काढून इथपर्यंत वाचलात त्याबद्दल धन्यवाद लेख आवडला असेल तरी इतर मित्रांना नक्की शेअर करा.