ऑनलाईन,ऑफलाईन पद्धतीने जमीन मोजणीसाठी येथे करा अर्ज | Jamin Mojani Sathi Arj Kothe Karava ?

Jamin Mojani :-

नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये शेत जमिनीच्या कमी जास्त क्षेत्राबाबत आजही खूप मोठ्या प्रमाणात केस न्यायालयात प्रलंबित आहेत. प्रत्येक ठिकाणी दोन भावांच्या जमीन वाटणी मध्ये जमिनीच्या  बांधा बाबत आजही वादविवाद  होत असतात. यातून मार्ग काढण्यासाठी आज ही प्रत्येक शेतकरी शासनाकडे जमीन मोजणीसाठी अर्ज करतात.Land Map Maharashtra

या संदर्भात आजच्या या लेखात संपूर्ण माहिती पाहणार आहोत,जमीन मोजणी अर्ज कोठे करायचा? अर्जाचा नमुना कोठे प्राप्त होतो? ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ कोणते इत्यादी, हा पोस्ट तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे तरी शेवटपर्यंत वाचा.jamin mojani

शेत जमीन मोजण्यासाठी शेतकऱ्यांना महसूल विभागाकडे अर्ज करावा लागतो हे अर्ज शेतकऱ्यांना दोन पद्धतीने करता येतात त्यामध्ये  ऑनलाइन पद्धतीने तर दुसरा ऑफलाइन पद्धतीने.यामधील कोणता सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने शेतकरी आपले शेत जमीन मोजणीसाठी अर्ज करू शकता.दोन्ही पद्धतीसाठी होणारा खर्च, निवड प्रक्रिया सर्व काही सारखं आहे.ऑनलाइन पद्धतीने अर्ज केल्यास कोणत्याही कार्यालयात जाऊन फॉर्म सबमिट करण्याची गरज नाही.

शेत जमीन मोजण्याची ऑनलाईन अर्ज :-

  • अधिकृत संकेतस्थळ ओपन करा 👉येथे क्लिक करा 👈
  • भुमि अभिलेख विभागाचा अधिकृत संकेतस्थळ ओपन केल्यानंतर ना, होम पेजवर डाव्या बाजूला ई-मोजणी हा पर्याय दिसेल.
  • ई मोजणी या पर्यावरण क्लिक करा.
  • पुढे विचारलेली संपूर्ण माहिती भरून ऑनलाइन मोजणीसाठी अर्ज करता येईल.
  • शेत जमीन मोजणीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना आपल्या जमिनीच्या क्षेत्रानुसार, मोजणीच्या कालावधीनुसार  आपणास फी ऑनलाईन पद्धतीने भरावे लागणार.

जमीन मोजणी साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे?

  • ज्या शेतजमिनीचा मोजणी करायचा आहे त्याचा सातबारा व आठ
  • शेतकरी अर्जदाराचा अर्जावर फोटो व सही
  • नमुना अर्जामध्ये विचारलेल्या इतर आवश्यक कागदपत्रेjamin mojani

शेत जमीन ऑफलाईन मोजणी अर्ज प्रक्रिया :-

  • शेतकऱ्यांना या ठिकाणी प्रत्यक्ष भूमी अभिलेख विभागाकडे अर्ज सादर करावे लागणार.
  • शेत जमीन मोजणीचा नमुना अर्ज डाऊनलोड करण्यासाठी अधिकृत संकेत ओपन करा
  • भूमी अभिलेख विभाग महाराष्ट्र शासनाचा अधिकृत संकेतस्थळ 👉येथे क्लिक करा 👈
  • वेबसाईटवर निळ्या रंगाच्या व्हेरिफिकेशन बार वरील डाउनलोड बटनावर क्लिक करा.
  • मोजणी या लिंक वर क्लिक करून संबंधित मोजणीचा अर्ज डाउनलोड करून घ्या.
  • डाउनलोड केलेला अर्ज प्रिंट आऊट करून आवश्यक किती कागदपत्रे जोडून तालुका पातळीवर असणारा भूमी अभिलेख कार्यालयात सादर करावा.

शेतकरी मित्रांनो दोन्ही पद्धतीने आपणास शेतजमीन मोजणीसाठी अर्ज करता येणार.आपल्या शेतजमिनीपासून तालुका कार्यालय तर लांब असेल आणि आपणास कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन अर्ज सादर करायचा होत नसेल तर आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे योग्य राहील.

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top