जमीन मोजणी अर्ज भरा ऑनलाईन,हे कागदपत्रे आवश्यक,एवढं येणार खर्च हेक्टरी | Jamin Mojani Online Form 2024

Jamin Mojani Online Form :- 

नमस्कार शेतकरी मित्रांनो,वाढत्या लोकसंख्या प्रमाणे जमीन तुकडे विभागणी खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत.शेतीचे हद्द कायमचे अनेक खटले आजही न्यायालयात चालू आहेत.शेतीच्या जमीन क्षेत्री मोजणीसाठी पूर्वी भूमी अभिलेख कार्यालत येथे ऑफलाईन भरून द्यावा लागत होता.या पद्धतीमध्ये शेतकर्‍यांना खूप वेळा हेलपाट मारावे लागत होते.आणि जमीन मोजणी वेळेवर होत नसे पण आता शेतकर्‍यांना सहजरित्या ऑनलाईन पद्धतीने जमिनीचे हद्द कायम (जमीन मोजणी) ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.ऑनलाईन अर्ज नोंदणी कोणत्या वेबसाईट वर करावं ,लागणारे महत्वाचे कागदपत्रे कोणते आहेत.या बदलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तरी पोस्ट पूर्ण वाचा .शेतकरी मित्रांनो जमीन मोजणी अर्ज एकूण दहा टप्पे मध्ये पूर्ण भरावा लागतो या वेबसाईट वरून आपणास हद्द कायम,पोट हिस्सा,बिगरशेती,गुंठेवारी अश्या मोजणी प्रकारसाठी अर्ज करता येतो.

लागणारे महत्वाचे कागदपत्रे :- 

  1. गटाचे संपूर्ण ७/१२ उतारा
  2. गटामधील सर्व सहधारकांचे आधार कार्ड
  3. जुना मोजणी नकाशा
  4. सीमाकांन प्रमाणपत्र
  5. योजना पत्रक उतारा ९ (३)-९ (४)
  6. टिपण

वरील कागदपत्रे लागतात हे सर्व महत्वाचे कागदपत्रे आपले तालुका भूमी अभिलेख कार्यालयात प्राप्त होतात.

Online Bhumi Application :-

  • अर्जदार,सह यांचे मोजणी जमीन ७/१२ उतारा ,E-mai ID हे अर्ज मोबाईल क्रमांक ,सह खातेदाराचे पूर्ण आधार कार्ड ,त्यांचा मोबाईल क्रमांक E-mail id आवश्यक .
  • ज्या शेत जमीनिचा मोजणी करायचं आहे.त्या चारीही बाजूच्या लगतच्या शेत जमीन गट नंबर ,त्या शेतकर्‍याचे नाव ,त्याचा रहिवाशी पत्ता ई मेल id  आपल्या जवळ असणे आवश्यक आहे .
मोजणी प्रकार येणारा खर्च :- 

कालावधी /जमीन प्रकार                   जिरायत        बागायत

नियमित                                        1000 रु     2000 रु

तातडी                                         2000 रु    4000 रु

अतितातडी                                   2000 रु     4000 रु

आति अतितातडी                          5000 रु       6000 रु

मित्रांनो वरील आकडेवारी तुम्ही ऑनलाइन फॉर्म भरताना दाखवलं जात या मध्ये कमी जास्त ही असू शकतो .

मोजणी अर्ज ऑनलाईन 

👉येथे क्लिक करा👈

 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *