आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रुग्णालयांतून आता नि:शुल्क “उपचार”Govt Hospitals in Maharashtra To Provide Free Of Cost Treatment

Govt Hospitals in Maharashtra To Provide Free Of Cost Treatment :-

नमस्कार मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २८ डिसेंबर २०१५ च्या शासन निर्णयानुसार सर्व शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णांना पुरवण्यात येत असलेल्या वैद्यकीय सेवा तपासणी व त्याबाबतचे शुल्क निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयामध्ये विशिष्ट रक्कम घेतले जात होते. परंतु यापुढे शिंदे सरकारने घेतलेला निर्णयानुसार  आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रुग्णालयात रुग्णांना वैद्यकीय सेवा तपासणीसाठी शुल्क द्यावे लागणार नाही.

शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील सर्व नागरिकांना सर्व प्रकारचे वैद्यकीय सेवा निशुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहेत विशेष मित्रांनो या निर्णयाची अंमलबजावणी १५ ऑगस्ट २०२३ पासून राज्यात लागू करण्यात येणार आहे .त्यामुळे राज्यातील गरीब आर्थिक दृष्ट्या दुर्लभ घटकातील नागरिकांना याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

Govt Hospitals in Maharashtra : 

या निर्णयासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत यांच्या प्रयत्नाला यश आले असे म्हणता येईल त्यांनी केलेल्या पाठपुरावामुळे हा निर्णय शासनाने घेतलेला आहे. या निर्णयासाठी भारतीय राज्यघटनेच्या कलम २१ नुसार प्रत्येक नागरिकास जगण्याचा अधिकार हा मूलभूत हक्क असून प्रदान करण्यात आलेला आहे.

राज्यातील नागरिकांची आरोग्य हीच संपत्ती या म्हण्यानुसार प्रत्येक नागरिकांना चांगली आरोग्य उपचार मिळावे. या हेतूने शासनाच्या माध्यमातून हे निर्णय घेण्यात आलेला आहे.

शासनाकडून जनतेसाठी आयुष्यमान भारत योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना यासारख्या महत्त्वाची योजना राबवण्यात येत आहेत या योजनेअंतर्गत राज्यातील नागरिकांना पाच लाख रुपये पर्यंत चा आरोग्याचा खर्च हमी शासनाचे यापूर्वी घेतलेला आहे या दोन्ही योजनेच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांना आरोग्याच्या एक कवच शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेला आहे. हा निर्णय शासनाचा राज्यातील नागरिकांना फायद्याचा ठरेल

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *