ई-पीक पाहणी करण्यास मुदतवाढ | E-Pik Pahani Mudatvadh Lest Update

ई-पीक पाहणी करण्यास मुदतवाढ | E-Pik Pahani Update 2022
ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड, ई पीक पाहणी लिस्ट, ई पीक पाहणी २०२२, ई पीक पाहणी last date.
नमस्कार शेतकरी मित्रांनो Mhsheti.com या वेबसाइट वर स्वागत करतो . ई-पीक पाहणी न झाल्याने राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अपडेट आहे .
खरीप ई-पीक पाहणी करण्यास मुदतवाढ :
मित्रांनो राज्यात राबविल्या जाणाऱ्या ई-पीक पाहणी प्रकल्पाला मुदत वाढ देण्यात आलेली आता शेतकऱ्यांना २२ ऑक्टोबर २०२२ पर्यंतआपल्या
पिकाची ई -पीक पाहणी करता येणार आहे. हे महत्त्वपूर्ण अशा प्रकल्पांमध्ये ई-पिक पाहणी ज्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतातील पिकाची
बांधावरील झाडांचे व शेतातील विहिर किंवा इतर काही माहिती आपल्या सातबारा वरती नोंदवता येते .आणि मित्रांनो २०२२ मध्ये अशाच प्रकारे राज्यातील लाखो शेतकऱ्यांनी आपल्या पिकाच्या आपल्या ७/१२ नोंदवलेले त्यांच्या पिकाच्या नोंदणी नमुना १२ दाखवायला सुरू झालेल्या तांत्रिक कारणांमुळे आपल्या शेतापासून दूर राहत असल्यामुळे किंवा निष्काळजी असल्यामुळे आपल्या पिकाची ई-पीक पाहणी करता आलेले नव्हते .
ई-पीक पाहणीचे महत्व :
अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळण्यासाठी असो किंवा शासनाच्या राबवण्यात जाणारे योजनांचा लाभ मिळविण्यासाठी आपल्या पिकाची नोंद
नमुना १२ असणे आवश्यक आहे आणि हीच नमुना १२ नोंद करण्यासाठी ई पीक पाहणी करणे सुद्धा तेवढेच आवश्यक आहे .(e pik pahani 2022)ई पीक पाहणी online मित्रांनो आता या शेतकऱ्यांना पुढील ०७ दिवसांमध्ये म्हणजे १५ ऑक्टोबर २०२२ पासून २२ ऑक्टोबर २०२२ पर्यंत
ई-पीक पाहणी करता येणार आहे.आणि त्याच्यानंतर २३ ऑक्टोबर ते पुढे १३ नोव्हेंबर २०२२ पर्यंत तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून येईल
E pik pahani online :-
ई-पीक पाहणी पुढील प्रक्रिया तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून.पार पाडली जाणार आहे अशाप्रकारे राज्यात राबविल्या जाणाऱ्या महत्त्वपूर्ण आणि शेतकऱ्यांसाठीआता मुदतवाढ देण्यात आलेली आहे.त्याच्यामुळे राज्यातील झालेल्या हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे . e pik pahani app downlond शेतकरी मित्रांनो तुम्ही जर तुमच्या पिकाची ई-पीक पाहणी केलं नसेल तर शासनाने दिलेल्या या मुदती मध्ये अवश्य ई-पीक पाहणी करा. वरील ई-पीक पाहणी बद्दलचा लेख तुम्हाला जर आवडला असेल तर तुमच्या इतर मित्रांपर्यंत नक्की शेअर करा.