E-Pik Pahani Status | ई-पीक पाहणी केलात का ? पण ते ओके झालं का असं चेक करा !

E-Pik Pahani Status :-

नमस्कार शेतकरी मित्रांनो,महाराष्ट्र शासन कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी विविध महसूल सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे.पूर्वी शेती पिकांचे ७/१२ उतारा वर नोंद करण्यासाठी शेतकऱ्यांना तलाठी ऑफिस येथे हेलपाटा मारावे लागत होते.पण आता हे ई-पीक पाहणी या मोबाईलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकांचे उतारावर सहजरीत्या नोंद करता येते.

खरीप हंगाम २०२३  मध्ये घेण्यात आलेल्या शेती पिकांचे ई-पिक पाहणी करिता २५ सप्टेंबर २०२३ हा अखेरचा तारीख होता या तारखेपर्यंत राज्यातील बरेच शेतकरी मोबाईल ॲप ई-पीक पाहणी वापरून शेती पिकांचे पीक पाहणी केलेले आहेत.

ई-पीक पाहणी स्टेटस  :- 

खूप साऱ्या शेतकऱ्यांना जुन्या व्हर्जनमध्ये ई-पीक पाणी करत ई-पीक पाणी झाले की नाही हे कन्फर्म झाले नाही.त्याकरिता ई-पीक पाहणी आपल्या शेती पिकांचे झाले की नाही.हे कशा पद्धतीने चेक करायचे या संदर्भात संपूर्ण माहिती या पोस्टच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत

E-Pik Pahani Status :-

  • मोबाईल मध्ये सर्वप्रथम तुम्हाला प्ले-स्टोअर वरून ई-पीक पाहणी चा व्हर्जन २.०.०.३ ॲप इंस्टॉल करा .
  • ॲप उघडा त्यानंतर महसूल विभाग निवडा.
  • तुम्ही नोंद केलेल्या खातेदाराचे नाव निवडा त्याखाली सांकेतिक क्रमांक टाईप करा
  • सांकेतिक क्रमांक लिहून प्रोसीड या बटनावर क्लिक करा
  • त्यानंतर आपल्या गावातील खातेदारांची पीक पाहणी हा पर्यायवर क्लिक करा .
  • या पर्याय निवडल्यानंतर तुमच्या गावातील सर्व शेतकऱ्यांची यादी दाखवली जाईल ‘अ’ ते’ ज्ञ ‘पर्यंत नावाच्या अध्यक्षरानुसार आपले नाव दाखवले जाईल.
  • त्यामध्ये प्रत्येक पेज १,२,३,असे क्रमांक दिसतील त्यावर क्लिक करत पुढे जा .
  • ज्या ठिकाणी तुमचं नाव दर्शवेल ते नाव जर हिरव्या पट्ट्यामध्ये दिसत असेल तर समजा की आपण केलेली ई-पीक पाहणी हे यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे.
  • ई-पीक पाहणी यादीमध्ये आपले नाव जर पांढऱ्या पट्ट्यामध्ये दर्शवत असेल समजून घ्या की ई-पीक पाहणी झालेलं नाही.
  • तुमच्या नावासमोर असलेल्या एका डोळ्याच्या चिन्हा वर क्लिक करा.
  • त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याने नोंदी केलेल्या पिकाची सविस्तर माहिती आपल्याला दर्शनवेल.

शेतकरी मित्रांनो वरील पद्धतीने आपण ई-पीक पाहणी या मोबाईलच्या माध्यमातून आपण केलेले काम यशस्वीरित्या झाले की नाही हे चेक करू शकता

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top