ई-पीक पाहणी खरीप २०२४ शेवटची मुदतवाढ ! E Pik Pahani Last Date kharip 2024

खरीप २०२४ ई-पीक पाहणी करण्यासाठी मुदतवाढ :-
शेतकर्यांनसाठी आनंदाची बातमी खरीप २०२४ आपल्या शेतातील शेती पिकाची ई पीक पाहणी करण्यास १ ऑगस्ट २०२४ पासून झाली आहे .यांची कालावधी हे अगोदर १५ सप्टेंबर २०२४ हे होत .पण बर्याचं शेतकरी बांधवांनी आजुन ई पीक पाहणी केले नाही ही बाब विचारात घेता शासनाने शेवटची मुदतवाढ दिली आहे .या संदर्भात सविस्तर माहिती आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहे .
ई-पीक पाहणी नोंदणी काय ? :-
शेतकर्यांना आपल्या शेतातील पीकांची नोंद ७/१२ वर स्वता करता यावा या करिता मागील चार वर्षा पासून राज्यात e pik pahani ही प्रणाली सुरू केलेली आहे.हे नोंद केल्यामुळे शेतकर्यांना यांचा भविष्यात नक्की फायदा होणार ,बँक मार्फत पीक कर्ज घेताना ,शेत जमिनीची खरेदी वि.क्री करताना ,नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाची झालेली नुकसनाची दावे इत्यादी अश्या एक ना अनेक शासनाच्या योजांचा लाभ घेण्याकरिता ७/१२ वरती पिकांची असावी लागते .
ई-पीक पाहणी खरीप २०२४ कशी करावी ?
e pik pahani kashi karavi शेतकर्यांना पिकांची नोंदणी करण्यासाठी ज्या शेती गटाचे करायचे आहे त्याठिकाणी जाऊन करावे लागतो तसेच हे ई पीक पाहणी नोंदणी दोन पद्धतीने करता येतो ,
- शेतकरी स्वत : मोबाईल वरून ई पीक पाहणी App मध्ये नोंदणी करू शकता .
- ई पीक पाहणी सहाय्यक यांच्याद्वारे पिकांची नोंद करू शकता .
- प्रथम आपल्या मोबाईल मध्ये जुने ई पीक पाहणी App असेलतर त्याला Update करा .नसेल तर प्लेय स्टोअर वरुन डाउनलोड करा.
- App ओपन केल्या वर शेतकरी रजिस्टेशन नसेल करून घ्या .(सोबत ८ अ घ्या )
- नंतर लॉगिन करून खरीप २०२४ ई पीक पाहणी करा .
खरीप २०२४ E Pik Pahani Last Date :-
शेतकर्यांना पिकांची नोंद करण्यासाठी १ ऑगस्ट २०२४ ते १५ सप्टेंबर २०२४ हे अंतिम देण्यात आला होता .पण खरीप २०२४ आजून नोंदी न झालेल्याने मुदतवाढ देण्यात आली असून शेतकर्यांना २३ सप्टेंबर २०२४ पर्यंत ई पीक पाहणी करता येणार आहे .तसेच संपूर्ण वर्षातील पिकाची नोंद करायची असल्यास शेतकर्यांना संपूर्ण वर्षामध्ये कधीही नोंद करता येणार आहे .