डिजिटल रेशन कार्ड काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे ! Digital Ration Card Documents Required
Digital Ration Card Documents Required :-
नमस्कार मित्रांनो,महाराष्ट शासनच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग ने निर्गमित २० डिसेंबर २०२३ GR नुसार शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली (RCMS) वरील Public Login मार्फत ऑनलाइन शिधापत्रिकाविषयक अर्ज करतांना उद्धवनणार्या समस्यांचे निराकरण करण्याकरिता मार्गदर्शक Module प्रसिद्ध करणायात आला .पूर्वी एखादे नवीन रेशन कार्ड काढायचं झालं की खूप सारे कागदपत्रे त्याबरोबर पुरवठा विभागाला शंभर हेलपाठे मारावे लागत होते .पण आता शासनाचे रेशनकार्ड काढण्यासाठी स्वतंत्र वेबसाईट विकसित केली आहे .
हे वेबसाईट सर्वसामान्य नागरिकांना वापरता येणार या अंतर्गत राज्यातील नागरिकांना नवीन शिधापत्रिके करिता अर्ज करणे ,शिधापत्रिकेतील पत्यामध्ये बदल करणे ,नांव वगळणे किंवा समाविष्ट करणे अशा शिधापत्रिकाविषकअनेक कामे करता येणार.Digital Ration Card रेशन कार्ड व्यवस्थान प्रणाली मध्ये (RCMS Website) राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या लाभार्थीकरिता QR Code आधारित ई-शिधापत्रिका ऑनलाइन तसेच डाऊनलोड करण्याची सुविधा देण्यात आली आहे .
अंत्योदय अन्न शिधापत्रिका (AAY),प्राधान्य कुंटुंब योजना (PHH),राज्य योजनेअंतर्गत APL Farmer,राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना NPH अशा सर्व प्रकारच्या सुविधा या पोर्टल वरती उपलब्ध करून देण्यात आले आहे.
डिजिटल रेशन कार्ड काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे :-
https://rcms.mahafood.gov.in/PublicLogin/frmPublicLogin.aspx
वरील संकेतस्थळावर क्लिक केल्यावर त्या ठिकाणी New User Singn Up Here हा पर्याय दिसेल या क्लिक करून नोंदणी केल्यावर,पुन्हा तुम्ही तयार केलेल्या User ID आणि Password टाकून लॉगिन करा.या ठिकाणी हे कागदपत्रे महत्वाचे आहे Add Member मध्ये ज्या ठिकाणी स्टार चिन्ह आहे असे सर्व पर्याय आपणास भरावं लागेल.
Add Member Documents :-
- ID साईज फोटो (२० kb jpeg/pdf)
- जॉब कार्ड (असेलतर अंकी नोंद करा नसेलतरी चालेल )
- जातीचा दाखला (असेलतर अंकी नोंद करा)
- ज्या व्यक्तीचे तुम्ही माहिती भरताय आईचे नांव आवश्यक
- जन्म दाखला ,माध्यमिक शाळा मार्कशीट ,पॅन कार्ड ,मतदान कार्ड इत्यादि (यापैकी एक असणे आवश्यक )
Attachment Enclosures Documents : –
1.Identity Proof Document :-
- मतदान कार्ड
- पॅन कार्ड
- पासपोर्ट
- ड्रायविंग लायन्स
- शासकीय ID कार्ड
- नांव व फोटो असेलेल शासकीय ओळखपत्र
- किसान फोटो पासबूक
- इतर शासकीय ओळखपत्र (यापैकी एक असणे आवश्यक )
2.Address Proof Documents :-
- मतदान कार्ड
- पॅन कार्ड
- पासपोर्ट
- ड्रायविंग लायन्स
- पत्ता उल्लेख शासकीय ID कार्ड
- टेलिफोन बिल
- विज बिल
- भांडा करार पत्र (यापैकी एक असणे आवश्यक )
3.Other Documents :-
- उत्पन्न दाखला
- मृत्यू दाखला
- जन्म दाखला
- एखाद्या सदस्यचं नांव वाढविणे किंवा कमी करणे बाबतचा प्रतिज्ञापत्र
- (मित्रांनो या ठिकाणी शकतो उत्पन्न दाखला जोडा )
डिजिटल रेशन कार्ड ऑनलाइन करण्यासाठी जे कुंटुंब प्रमुख आहे त्यांच्या आधार कार्डला मोबाईल लिंक असणे आवश्यक आहे . हा पोस्ट जर महत्वाचं वाटलं तर नक्की पुढे शेअर करा .