Digital Crop Survey Application :-
नमस्कार शेतकरी मित्रांनो,पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र,पिकांच्या लागवडी या सर्वांचा अचूक माहिती संकलन करण्यासाठी राज्य शासनाच्या मार्फत १५ ऑगस्ट २०२१ ई-पीक पाहणी ॲप सुरू करण्यात आले.यांच्या साह्याने शेतकर्यांना शेतातील पिकांची नोंद करणं सोप झालं. या ॲप मध्ये असणारे चुका दुरुस्त करून अचूकता आणण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून डिजिटल क्रॉप सर्वे ॲप विकसित करण्यात आलेला आहे. E-Pik Pahani
डिजिटल क्रॉप सर्वे ॲप :-
या मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून पुढील हंगाम पर्यंत राज्यामध्ये सुद्धा ई पीक पाहणी केली जाणार आहे .राज्य शासनाच्या माध्यमातून ई पीक पाहणी प्रकल्प विकसित करण्यात आलेला आहे गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी ॲप माध्यमातून ई पीक पाहणी करत आहेत.परंतु या ई पीक पाहणी करत असताना खूप सार्या चुका केले जातात त्यामध्ये दुरून फोटो काढणे ,डाटा चुकीचा भरणे असे .
Digital Crop Survey App :-
राज्यातील शेती पिकांची अचूक माहिती संकलित करण्यामध्ये मोठ्या समस्या येत आहेत याचं पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या माध्यमातून हे डिजिटल क्रॉप सर्वे ॲप विकसित करण्यात आला आहे .
डिजिटल क्रॉप सर्वे ॲप वैशिष्ट्ये :-
- चुकीचा डाटा भरता येणार नाही .
- लाभार्थ्याला याच्यामध्ये आपली ई-पीक पाहणी करत असताना ५० मीटर च्या अंतरावरून फोटो काढणे बंधनकारक राहील .
- चुकीच्या पिकाचा फोटो किंवा चुकीचे फोटो याच्यामध्ये अपलोड करता येत नाही.
- चुकीच्या पद्धतीने ई पीक पाहणी याच्यामध्ये करता येणार नाही.
डिजिटल क्रॉप सर्वे ॲप राज्यात प्रायोगिक तत्त्वावर सुरू असून राज्यातील प्रत्येक तालुक्यातील निवडक २ गावे असे एकूण ११४ गावामध्ये सुरू,याची कार्यवाही ०१ ऑगस्ट २०२३ सुरू करण्यात आला आहे . याचं बरोबर देशातील एकूण १२ राज्यात प्रायोगिक तत्वावर हे ॲप वापरलं जात आहे .महाराष्ट्रात २०२४ च्या खरीप पासून सर्व जिल्ह्यात वापरण्यास सुरुवात होईल अशी शक्यता आहे .
👇👇👇👇