DBT For Keshari Ration या शेतकर्‍यांना राशन ऐवजी थेट रोख रक्कम मिळणार

DBT For Keshari Ration Card : –

नमस्कार मित्रांनो ,राज्यात औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्हातील APL (RationCard)केशरी रेशन कार्ड धारक शेतकर्‍यांना अन्नधान्यऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजना सुरू करण्यात आले आहे .या बाबतचा एक महत्वपूर्ण शासन निर्णय दिनांक २८ फेब्रुवारी २०२३ रोजी निर्गमित करण्यात आला आहे .नेमकं कोणत्या जिल्हातील शेतकर्‍यांना याचा फायदा होणार त्यासाठी काय प्रक्रिया आहे या बदलची संपूर्ण माहिती या लेखात पाहणार आहोत .तरी लेख संपूर्ण वाचा .(dbt for ration maharashtra)

DBT For Keshari Ration Card GR : – 

महाराष्ट शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या सन २०१५ च्या निर्णयान्वये राज्यातील औरंगाबाद,जालना ,नांदेड ,बीड ,

उस्मानाबाद ,परभणी ,लातूर ,हिंगोली ,अमरावती ,वाशिम ,अकोला ,बुलढाणा ,यवतमाळ ,व वर्धा अशा  १४ शेतकरी आत्म*हत्या*ग्रस्त

जिल्हातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम ,२०१३अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL रेशनधारक शेतकर्‍यांना प्राधान्य कुटुंब लाभार्थ्याप्रमाणे {प्रती महिना प्रती सदस्य ५ किलो अन्नधान्य ,रु २ ,प्रती की.लो गहू, ३ रु की लो तांदूळ }या दराने लाभ देण्यात येत होता .(Direct Benefit Transfer -DBT) सदर योजनेकरिता अन्नधान्य खरेदी हे केंद्र सरकार NON NFSA करत या ठिकाणी गहू प्रती किलो २२ रु ,तांदूळ २३ रु किलो या दराने करण्यात येत होती . या योजनेतून वाटप करण्यासाठी पुढे गहू व तांदूळ उपलब्ध होणार नसल्याचे भारतीय अन्न महामंडळाने सन २०२२ मध्ये कळवले .

वरील सर्व गोष्टीचा विचार करून राज्यशासन या १४ जिल्हातील शेतकर्‍यांना अन्नधान्यऐवजी थेट रक्कम.(Direct Benefit Transfer -DBT) द्वारे हस्तांतरण करण्याचे निर्णय शासनाच्या विचाराधीन होता .

DBT For APL Ration GR :-(शासन निर्णय )

औरंगाबाद,जालना ,नांदेड ,बीड ,उस्मानाबाद ,परभणी ,लातूर ,हिंगोली ,अमरावती ,वाशिम ,अकोला ,बुलढाणा ,यवतमाळ ,व वर्धा अशा  १४ शेतकरी आत्म*हत्या*ग्रस्त जिल्हातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम ,२०१३ अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL रेशन कार्ड धारक शेतकरी लाभार्थीना माहे जानेवारी २०२३ पासून अन्नधान्यऐवजी प्रत्येक महिना प्रति लाभार्थी १५० रुपये इतका रोख रक्कम थेट DBT च्या माध्यमातून जमा केली जाणार आहे . तसेच प्रतिवर्षी किमान आधारभूत किमतीत होणार्‍या वाढीनुसार केंद्र शासनाने अधिसूचित केलेल्या cash transfer of food subsidy rules 2015  मधील तरतुदींनुसार प्रती लाभार्थी सुधारित वाढीव रोख रक्कम देण्यात येईल .

👇👇👇👇

अन्नधान्यऐवजी मिळणार पैसे

शासन GR वाचा  

👉येथे क्लिक करा👈

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top