पशूवैद्यकीय विभाग अंतर्गत वैयक्तिक लाभ योजनाचे अर्ज सुरू ! Dairy Development Scheme For Maharashtra Farmers 

नमस्कार शेतकरी  मित्रांनो, ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना शेती व्यवसाय बरोबर जोड व्यवसाय करता यावा यातून येणार्‍या उत्पन्नातून शेतकरी आर्थिक दृष्ट्या सदृढ व्हावे हा मुख्य उद्देश शासनाचा आहे.Dairy Development Scheme For Maharashtra Farmers पशुसंवर्धन विभाग अंतर्गत काही योजना राबविले जात आहेत. ते कोणते योजना या संदर्भात संपूर्ण माहिती या पोस्ट मध्ये पाहणार आहोत.तरी पोस्ट पूर्ण पणे वाचा .

पशुसंवर्धन वैयक्तिक लाभ योजना :-

राज्यातील काही जिल्हा परिषदेचा मार्फत शेतकऱ्यांकडून अर्ज मागविले जात आहे सध्या जिल्हा परिषद सोलापूर विविध वैयक्तिक लाभाच्या योजना अर्ज भरणे सुरू आहे.पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांच्यामार्फत खालील वैयक्तिक लाभच्या योजना अर्ज स्वीकारणे सुरू.हा अर्ज आपण पशुवैद्यकीय दवाखाना या ठिकाणी भरून द्यावा.

वैयक्तिक योजना चे नाव :-

  • आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या शेतमजूर / शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदानावर चार शेळ्या एक बोकड वाटप करण्यात येणार
  • ५०%टक्के अनुदानावर पशुपालकांना मिल्किंग मशीन पुरवणार
  • ५०% मुरघास निर्मिती वापरासाठी कमाल दोन दुधाळ जनावरांसाठी ३३ टक्के अनुदान देणे.
  • खनिज मिश्रण वापरासाठी कमाल दोन दुधाळ जनावरांसाठी ३३% अनुदान देणे बाबत

वरील योजनेचे लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी २३ सप्टेंबर २०२४  ते २२ ऑक्टोबर २०२४ पर्यंत अर्ज भरून जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात सादर करावा.

टीप :- मित्रांनो सदर योजनेचे अर्ज सोलापूर जिल्हा परिषद मार्फत सध्या स्थितीला राबवले जात आहेत यांची नोंद घ्यावी

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *