शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होणार अग्रीम पीक विमा,दिवाळीपूर्वी | Crop Insurance Advance in Farmers Before Diwali

नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम २०२३ प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत राज्यात ०१ कोटी ७० लाख शेतकऱ्यांनी विक्रमी पिक विमा काढलेला असून यामध्ये आंतर पिकाचा ही विमा काढण्यात आलेला आहे. खरीप हंगामा मध्ये राज्यात ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये राज्यामध्ये काही जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेती पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Crop Insurance in Advance :- 

मुख्यता नागपूर जिल्ह्यामध्ये झालेला २३ सप्टेंबर रोजी चा पाऊस हा ढगफुटी सदृश्य होता या पावसामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खूप मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकांचा नुकसान झालेला आहे.त्याचबरोबर या पिकावर सध्या कीड व रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत असल्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे .अति पावसामुळे या पिकावर पिवळ्या मोजा व्हायरसचा प्रादुर्भाव वाढला आहे, या सर्व स्थितीची पाहणी करता राज्याची कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या जिल्ह्यातील पाहणी केली असता येथील शेतकऱ्यांना महत्त्वाची आश्वासन दिले.

Crop Insurance :- 

यावर्षी महाराष्ट्र शासनाने एक रुपया मध्ये पिक विमा काढण्याचा सुविधा उपलब्ध करून दिले,विम्याचे उर्वरित प्रीमियम रक्कम महाराष्ट्र शासनाने भरला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२३ चा पिक विमा सर्वात कमी प्रीमियम मुळे मिळणार आहे.

या खरीप हंगामा मध्ये झालेला अतिवृष्टीमुळे,ढगफुटी सदृश्य या कारणामुळे नुकसान झालेल्या शेती पिकांचा,अशा सर्व पिक विमाधारकांना पिक विमा नुकसान भरपाई देय  रकमेची २५% रक्कम दिवाळीपूर्वी खात्यात जमा केले जाणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.kharip pik vima 

त्याचबरोबर ६५  मिलिमीटर पेक्षा जास्त , सतत चार तास पाऊस ज्या  ठिकाणी झालेला आहे.अशा अतिवृष्टी ज्या ठिकाणी पिकांचे नुकसान झाले असेल तिथे राज्य आपत्ती निधी मदत व केंद्र आपत्ती मदत निधी नियमानुसार शेतकऱ्यांना मदत करण्यात येणार त्यांना ही मदत कार्य लवकरचं देण्यात येणार असल्याची माहिती दिले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *