बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना २०२२ | Birsa Munda Yojana Maharashtra

Birsa Munda yojana

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना २०२२ | Birsa Munda Yojana Maharashtra :- 

शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये सेवा पंधरवडा राबविला जात आहे महाराष्ट्र मध्ये ” राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता” याप्रमाणे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर या कालावधीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या विविध भागातील सेवा नागरिकांना देण्यात येत आहे.

Birsa Munda Yojana Maharashtra 2022:-

सेवा पंधरवड्यामध्ये दिले जाणारे सेवा :

  1. महाऑनलाईन वरील दाखले:-
  2. आपले सरकार सेवा केंद्र याच्या माध्यमातून येणारे सेवा
  3. महाराष्ट्र शासनाच्या तक्रार निवारण पोर्टल वरील सेवा
  4. कृषी विभागाच्या महाडीबीटी या पोर्टल वरील विविध अनुदानासाठी अर्ज मागवण्याचे मोहीम
  5. शैक्षणिक क्षेत्रातील प्रवेश प्रक्रिया मध्ये विशेष मोहीम
  6. महसूल विभागाचे प्रलंबित प्रकरणे  ,शेतकरी मित्रांनो या सेवा पंधरवड्यामध्ये कृषी विभागांतर्गत महत्त्वाचं योजना बिरसा मुंडा याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत, याबरोबर ही योजना कोणत्या वेबसाईटवर आपल्याला ऑनलाइन फॉर्म भरता येईल, त्यासाठी लागणारी पात्रता कोणती आहे, बिरसा मुंडा योजना शासनाकडून किती प्रमाणामध्ये अनुदान प्राप्त होणार आहे हे देखील आपण पाहणार आहोत लेख संपूर्ण वाचा म्हणजे आपल्याला या योजनेचे लाभ कसे मिळेल या बद्दलची संपूर्ण माहिती प्राप्त होईल चला तर मग माहितीला सुरु करुया.

Birsa Munda Krushi Kranti Yojana 2022

महाराष्ट्रात सध्या सेवा पंधरवडा च्या अंतर्गत कृषी विभागाकडून अनुसूचित जमाती च्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा योजनेचे अर्ज मागविण्यात येत आहे, ही योजना विशेषता महाराष्ट्रा मधील अनुसूचित जमाती (ST) यांच्यासाठी आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकार ही योजना राबवत आहे या प्रवर्गातील शेतकऱ्यांचे कोरडवाहू जमीन ओलिताखाली आणण्याचा प्रयत्न महाराष्ट्र राज्य सरकार करत आहे या योजनेअंतर्गत या शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतामध्ये पाणी उपलब्ध करून घेण्यास मदत होणार आहे या योजनेमध्ये प्रामुख्याने जलसिंचन स्त्रोत्रा वर भर दिले आहे अनुसूचित जमातीमधील शेतकऱ्यांना कमी पाण्यामध्ये जास्त उत्पादन मिळवून देण्यासाठी या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान देऊन प्रोत्साहित केले आहे.

योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान:

  1. नवीन विहिरी घेण्यासाठी
  2. जुने विहिरीच्या दुरुस्ती/ बोरवेल घेण्यासाठी
  3. शेततळ्याच्या ताडपत्री अस्तीकरण
  4. बोरवेल व विहिरीवरील विद्युत जोडणी साठी कोटेशन भरण्यासाठी
  5. तुषार सिंचन व ठिबक सिंचन

वरील एवढ्या घटकासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे.

बिरसा मुंडा योजना कोण पात्र ?

बिरसा मुंडा योजना फक्त अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी पात्र राहतील.

 

कागदपत्रे :

1) 7/12, 8 अ जमिनीचा
2)जातीचा दाखला
3)उत्पन्न दाखला
4)कृषी अधिकारी यांचे पाहणी शिफारस पत्र
5)ज्या ठिकाणी विहीर अथवा बोरवेल घेतला आहे त्या ठिकाणचा फोटो

शेतकऱ्यांना दिला जाणारा अनुदान :

नवीन विहीर साठी रु २.५० लाख एवढे अनुदान
बोरवेल घेण्यासाठी रु २०००० हजार अनुदान
विज जोडणी साठी रु १०००० हजार अनुदान
ठिबक सिंचनासाठी रु ५००००, तुषार सिंचनासाठी रु २५०००
परसबाग निर्माण करण्यासाठी रु ५०० एवढे अनुदान देण्यात येईल
पाईपलाईन करण्यासाठी पीव्हीसी पाईप साठी रु ३०००० एवढे अनुदान
अशा पद्धतीने या प्रत्येक कामासाठी कागदपत्रे वेगळे असणार आहेत त्याच बरोबर त्याला मिळणारा अनुदानही वेगवेगळे आहे.
महत्त्वाची माहिती :
महाराष्ट्रामध्ये बिरसा मुंडा योजना हे जिल्हे सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, मुंबई इतर सर्व जिल्ह्यात ही योजना राबवली जात आहे, अनुसूचित जमातीमधील शेतकरी त्यांचा वार्षिक उत्पादन२.५ लाखापेक्षा जास्त असू नये. प्रत्येक योजनेसाठी किमान पात्रता इतके जमीन शेतकऱ्यांच्या नावे असणे गरजेचे आहे, एकदा हे जर लाभ घेतल्यास पुढील पाच वर्षासाठी त्या कुटुंबातील कोणत्याच लाभार्थ्याला कृषी विभागाचे लाभ घेता येणार नाही.
या योजनेचे लाभ घेण्यासाठी महाडीबीटी या पोर्टल च्या माध्यमातून शेतकऱ्यांना ऑनलाइन फॉर्म भरावे लागेल.
वेळ काढून संपूर्ण लेख आपण वाचला त्याबद्दल तुमचं मनापासून आभारी हे महत्त्वाची माहिती इतर शेतकऱ्यापर्यंत नक्कीच शेअर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top