Bachat Gat Tractor Subsidy Apllication 2024 | बचत गटांना ट्रॅक्टर अनुदान,तुम्ही अर्ज केला का ?

नमस्कार मित्रांनो ,महाराष्ट्र शासन मार्फत राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण योजना राबविला जातो,अनुसूचीत जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसाहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने खरेदी करण्यासाठी अनुदान दिला जातो.सन 2024-25 या आर्थिक वर्षी योजना लाभ घेण्यासाठी आपल्या ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावे लागेल. सध्या काही जिल्हात या अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू …..
सोलापूर जिल्हासाठी ‘सहायक आयुक्त ,समाजकल्याण कार्यालय डॉ.बाबासाहेब आंबेडकर,सामाजिक न्याय भवन,तिसरा मजला,सात रस्ता’ या कार्यालयाकडे ३१ डिंसेबर 2024 पर्यंत Tractor Subsidy गटांनानी आपले अर्ज सादर करावे.
Tractor Subsidy 90% Bachat Gat :-
स्वयंसाहाय्यता बचत गटांना शासनाच्या माध्यमातून 90% हे मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांची खरेदीची कमला मर्यादित 3.50 लाख इतकी असतो . या मध्ये बचत गटांना कमाल मर्यादेच्या रक्कमेच्या किंवा प्रत्यक्ष साधनाच्या किंमतीच्या 10 टक्के स्वता हिस्सा भरावा लागतो.प्रत्यक्ष किमतीच्या 90 टक्के (कमाल 3.15 लाख ) शासकीय अनुदान दिला जातो .Tractor subsidy application online 2024
लागणार महत्वाचे कागदपत्रे(Tractor Subsidy Documents 2024) :-
मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा करण्यासाठी अनुसूचीत जाती व नवबौद्ध घटकांसाठी खलील कागदपत्रे व अटी ….
- बचत गटातील सर्व सदस्य हे राज्याचे रहिवाशी असावे .
- बचत गटातील 80 टक्के सदस्य हे अनुसूचीत जाती व नवबौद्ध घटकातील असावेत .
- सक्षम अधिकारी यांनी दिले जातीचे दाखले सादर करावेत .
- सर्व सदस्य रेशन कार्ड असावेत .
- सर्वाचे आधार कार्ड.
- गावातील ग्रामसेवक,सरपंच व तलाठी यांचे रहिवासी प्रमाणपत्र .
लाभर्थ्यांनी निवड पद्धत :-
अनुसूचीत जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसाहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने पुरवठा करण्यात येणार आहे.सहायक आयुक्त,समाजकल्याण सोलापूर
यांचे मार्फत सांगण्यात आले की यासाठी 31 डिंसेबर पर्यत आलेले अर्ज जर तरतुदीपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लॉटरी पद्धतीने लाभर्थ्याची निवड केलं जाईल .
सौजन्य : लोकमत