अतिवृष्टीमुळे जून ते ऑक्टोबर २०२३ ,नुकसान भरपाई निधी वितरित GR आला. Ativrushti Nuksan Bharpai Kyc Online

Ativrushti Nuksan Bharpai List 2023 : –

नमस्कार शेतकरी मित्रांनो ,राज्यामध्ये जून ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेती पिके / शेत जमीन वगळून मालमत्ता व इतर नुकसानिकरीता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत चा GR दिनांक २३ जानेवारी २०२४ रोजी निर्गमित करण्यात आला आहे .या संदर्भाची संपूर्ण माहिती पोस्ट मध्ये पाहणार आहेत .

Ativrushti Nuksan 2023 :-

मार्च ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत राज्यात झालेला अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेती पिकांचे व शेत जमिनी मालमत्ता व इतर नुकसानीसाठी बधितांना  त्यांना मदत देण्याकरिता या अगोदर शासनाने निर्णय घेतला होता घेतलेल्या निर्णयानुसार रुपये २७५.३० दश लक्ष इतका निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे.

सदरचे निधीचे वितरित करताना शासनाने नियमाचे काटेकोरपणे पालन करावे तसेच ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदरचा निधी खर्च करण्यात यावा ही मदत देताना केंद्र शासनाने चक्रीवादळ पूर इत्यादी नैसर्गिक आपत्ती करिता विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता होत असल्याची खात्री करून निधी वितरित करावे.

Ativrushti Nuksan Bharpai Kyc Online :- 

अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्ती करता अतिवृष्टीच्या निकषानुसार मंडळांनी २४ तासात ६५ मिली पेक्षा जास्त नोंद झालेले असल्यास ही मुदत अनुदेय राहील मात्र, ज्या ठिकाणी पूर आलेला असेल त्या ठिकाणी अतिवृष्टीचा निकष लागू राहणार नाही.लाभार्थ्यांना मदत वाटपाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्हा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार.

अशा प्रकारचा हा शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय आहे यामुळे जे शेतकरी अजून नुकसान भरपाई पासून वंचित आहेत अशा शेतकऱ्यांना आता लवकरच भरपाई प्राप्त होणार आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top