ग्रामपंचायत विकास आराखडा मधील कामे कोणते ? पहा मोबाईलवर ! Approve Action Plan Report Gpdp 2024-25

what is the budget estimate for 2024-25 ?

नमस्कार मंडळी,’आमचं गाव,आमचं विकास‘अंतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा सन २०२४-२५ मध्ये आपल्या ग्रामपंचायत ने गावातील कोणत्या कामाची निवड केली आहे. त्यासाठी येणारा शासनाचा निधी किती, एकूण निधीच्या किती टक्के निधी हा ग्रामपंचायत  कोणत्या कामावर खर्च करतोय, हे सर्व माहिती आपणास Gpdp आराखडा मध्ये पाहायला  मिळतो.आपल्या गावाचा विकास आराखडा कशा पद्धतीने डाऊनलोड करायचं या संदर्भाची संपूर्ण माहिती या पोस्टमध्ये पाहणार आहोत तरी हा पोस्ट संपूर्ण वाचा.

शासनाच्या माध्यमातून १५ वा वित्त आयोग विकास आराखडासाठी प्रत्येक ग्रामपंचायतला विशिष्ट निधी येतो हे रक्कम ग्रामपंचायत तिने निवडलेल्या संकल्प वर खर्च करण्यास शासनाच्या माध्यमातून मंजुरी दिली जाते. त्यामध्ये पाणीपुरवठा,स्वच्छता,इतर विकास कामे या महत्त्वाच्या संकल्पनेवर आराखडा मध्ये जास्त कामे घेतले जातात.या आराखडा मध्ये ग्रामसभेमध्ये आपण सुचवलेले कामांची नोंद आहे का हे पाहण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.

What is the theme of budget 2024 ?

Approve Action Plan Report

  • मित्रांनो प्रथमता आपल्या मोबाईल मध्ये Google Chrome Open करा.
  • eGramSwaraj  अस सर्च करा.
  • आपणास Approve Action Plan Report (अप्रो ॲक्शन प्लॅन रिपोर्ट) हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  • तुम्ही ‘गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री,ऑफ पंचायतराज च्या इ-ग्रामस्वराज’ पोर्टल वरती रिडायरेक्ट व्हालं.
  • अप्रो ॲक्शन प्लॅन रिपोर्ट यामध्ये ज्या वर्षाचा विकास आराखडा डाऊनलोड करायचा आहे तो सन निवडा.
  • खालील बॉक्समध्ये आपणांसमोर असलेला कॅप्चर टाईप करा.
  • Get Report या ऑप्शनवर क्लिक करा.
  • आपणांसमोर देशातील सर्व राज्यांचे नाव दिसतील त्यामध्ये महाराष्ट्र राज्य समोरील शेवटच्या कॉलम(Village Panchayat Equivalent) मधील आकड्यावरती क्लिक करा.
  • राज्यातील सर्व जिल्ह्यांची नावे आपणासमोर ओपन होतील त्यामध्ये अप्रो ॲक्शन प्लॅन काउंट या कॉलम मध्ये आपल्या तालुका नावासमोर क्लिक करा.
  • ओपन झालेल्या यादीमध्ये आपल्या गावाच्या नावासमोर असणाऱ्या View क्लिक करा.
  • आपणांसमोर आपल्या गावाचा आराखडा ओपन होईल उजव्या कोपऱ्यात वरील बाजूस दिसणारा एक्सपोर्ट टू pdf या ऑप्शन वरती क्लिक करा.
  • या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्या गावाचा विकास आराखडा डाऊनलोड होईल त्यामध्ये आपल्या गावातील कामे पाहू शकता.

या विकास आराखडा मध्ये ग्रामपंचायत स्व:निधी, शासनाच्या माध्यमातून येणारा बंधित निधी, अबंधित निधी,कोणते कामे अगोदर घेतली जाणार, याबद्दलची संपूर्ण माहिती  यामध्ये पाहू शकता.मित्रांनो ही महत्त्वाची माहिती आपणास आवडला असेल तर इतर गावकरी मंडळींना शेअर करा.

 

Gpdp आराखडा डाउनलोड 

👉येथे क्लिक करा👈

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top