गुढी पाडवा ला मिळणार दिवाळी सारखं १०० रू.आनंदाचा शिधा | Anandacha Shidha Yojana 2023
Anandacha Shidha 2023:-
नमस्कार मित्रांनो ,राज्यातील जनतेचा हिंताचा विचार करून सध्या शिंदे सरकार निर्णय घेत आहे .राज्यातील जनतेला दिवाळी सारखं १०० रु. यात खूप काही दिलं जाणार आहे .यावरती २२ फेब्रुवारी २०२३ राज्य मंत्रिमंडळ निर्णय घेतला आहे .या वर्षी राज्य सरकार गुढीपाडवा आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत देणार “आनंदाचा शिधा ”
Ration Card Pakage 2023:-
सन २०२२मध्ये दिवाळी मध्ये केवळ १०० रुपयात “आनंदाचा शिधा “दिल्यानंतर आता गुढीपाडवा ,डॉ आंबेडकर जयंतीनिमित्तानेही देणार आहेत ,anandacha shidha हे पुढील महिन्या पासून वितरणास सुरुवात होणार ,राज्यातील १४ आ*त्म*ह*त्या*ग्रस्त जिल्हात ही वितरण ,याचं लाभ १.६३ कोटीहून अधिक कुटुंबांना लाभ मिळणार आहे .Ration Card New Update
Anandacha Shidha काय मिळणार ?
- रवा
- चणाडाळ
- साखर प्रत्येकी १ किलो
- गोडे तेल १ लीटर
वरील घटकांचा वितरित या आनंदाचा शिधा मधून राज्यातील जनतेला मिळणार आहे सरकार च्या या निर्णयामुळे एकूण ४७३ कोटी रुपयांचा आर्थिक भार येणार आहे .राज्यातील शिधापत्रिकाधारकांना गुढी पाडवा भेट मिळतं आहे याचा लाभ १ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजेच सुमारे ७ कोटी लोकांना प्रत्यक्ष लाभ होणार .