Anandacha Shida April 2024 :-
११ मार्च २०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. गेल्या वर्षी प्रमाणे या वर्षीही गुढीपाडवा,डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त राज्यातील शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा देण्यात येणार ! राज्यात गुढीपाडवा डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती आधी सणानिमित्त आनंदाचा शिधा वितरण करण्याचा निर्णय झाला या निर्णयानुसार अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजी नगर व अमरावती विभागातील सर्व नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेवरील Apl केसरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना
मिळणारे वस्तु :-
प्रत्येकी एक किलो प्रमाणे रवा, चणाडाळ, साखर, एक लिटर सोयाबीन तेल इत्यादी वस्तू वितरित करण्यात येणार.यामुळे राज्यातील सुमारे २५ लक्ष अंत्योदय अन्न योजना, १.३७ कोटी प्राधान्य कुटुंब व ७.५ लक्ष शेतकरी योजनेतील शिधापत्रकधारकांना या आनंदाचा लाभ मिळणार.याचा लाभ राज्यामध्ये सुमारे १.६९ कोटी शिधापत्रिका धारकांना होणार.आनंदाचा शिधासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून ५५० कोटी ५७ लाख रुपये निधी खर्च करण्यास मंजुरी देण्यात आला.
मंत्रिमंडळ निर्णय आईचं नांव बंधनकारक सर्व कागदपत्रावर :-
यापुढे सर्व शासकीय कागदपत्रावर आईचे नाव बंधनकारक शासकीय दस्तावेजामध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न दाखवता आता, उमेदवाराचे नाव आईचे नाव नंतर वडीलाचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नोंदवण्याचे बंधनकारक करण्याचा निर्णय ११ मार्च २०२४ च्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झाला.
०१ मे २०२४ रोजी व त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकांचे नावांचे नोंद प्रथम बालकाचे नाव आईचे नाव नंतर वडीलाचे नाव व आडनाव अशा स्वरूपात सर्व शैक्षणिक कागदपत्रे ,महसूल दस्तावेज, वेतन चिट्टी ,सेवा पुस्तक, विविध परीक्षांच्या,अर्जाचे नमुने इत्यादी शासकीय दस्तावेजामध्ये ही नियमावली बंधनकारक करण्यास मान्यता देण्यात आली
विवाहित स्त्रियांच्या बाबतीत सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धतीनुसार त्यांच्या विवाह नंतर म्हणजेच तिचे नाव नंतर तिच्या पतीचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नाव नोंदविण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात येणार.स्त्रीला विवाहपूर्वीच्या नावाने मालमत्तेच्या दस्तऐवजामध्ये नोंदविण्याची मुभा ठेवण्यास मान्यता.
एकूणचं वडिलांच्या नावा इतकचं आईच्या नावालाही महत्व प्राप्त झाले.
मित्रांनो हे होते मार्च महिन्यामध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीचे निर्णयामधील महत्वाचे मुद्दे ही माहिती जर आपणास उपयुक्त वाटल्यास इतर मित्रांना नक्की शेअर करा.
धन्यवाद ! जय महाराष्ट्र