fifo pranali in marathi questions and answers

fifo pranali in marathi Information : –

फिफो प्रणाली चे फायदे :- 

या प्रणालीच्या माध्यमातून एकूण तीन डेस्कच्या माध्यमातून दाखले निकाली काढण्यात येतो.

  • पहिला डेस्क क्लर्कचा, दुसरा अव्वल कारकून म्हणजे नायब तहसीलदार, तिसरा डिस्क तहसीलदार, उपजिल्हाधिकारी / प्रांताधिकारी अर्ज निकाली काढण्यासाठी ही यंत्रणा काम करत.
  • फिफो प्रणालीनुसार तारीख व वेळेनुसार प्रथम अर्ज करणाऱ्यांचा अर्ज स्वीकारला किंवा नाकारला जाणार.
  • पहिल्या अर्जावर कारवाई होत नाही तोपर्यंत दुसरा अर्ज प्रक्रिया करण्यासाठी ऍक्टिव्ह होणार नाही.
  • कोणतेही प्रमाणपत्र अथवा दाखले लवकर मिळवून देतो यासाठी अतिरिक्त पैसे घेऊ शकणार नाही.
  • नागरिकांनी पण देऊ नये कारण काम नियमा नुसारचं होणार आहे.

महसूल विभागातील प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयात करावी लागणारी पायपीट यामुळे थांबेल. थेट अर्दारांच्या लॉगिन वरचं  हे प्राप्त होणार आहे.

प्रमाणपत्र नियमानुसार मिळवण्याचे कालावधी :-

  • जातीचे प्रमाणपत्र  ४५ दिवस
  • उत्पन्न दाखला १५ दिवस
  • नॉन क्रिमीलेअर २१  दिवस
  • रहिवासी दाखला ०७ दिवस
  • ज्येष्ठ नागरिक ०७ दिवस
  • अल्पभूधारक १५  दिवस

मित्रांनो  शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत असल्याने विविध दाखल्याची आपणास गरज असते अशा वेळी फिफो प्रणालीमुळे नागरिकांचे अतिरिक्त पैसे वाचणार आहेत. महसूल विभागातील प्रत्येक प्रमाणपत्र आता नियमा  प्रमाणे पास होणार आहेत त्यामुळे लवकर प्रमाणपत्र मिळवून देतो.अशा गोष्टी करणाऱ्या वर विश्वास ठेवू नका.फिफो  प्रणाली बद्दलचा संपूर्ण माहिती आपणास आवडल्यास इतर मित्रांना नक्की शेअर करा.

error: Content is protected !!
Scroll to Top