महाराष्ट्रात लवकरचं २०००० हजार पोलिस भरती | Maharashtra Police Bharti Update 2022

नमस्कार मित्रांनो,MH-शेती.com या या वेबसाईटवर आपले स्वागत आहे . महाराष्ट्र मध्ये पोलीस भरतीची तयारी करणारे तरुण वर्ग ज्या गोष्टीचे ते आतुरतेने वाट पाहत होते. ते प्रतीक्षा आता संपणार. राज्यात खूप मोठी पोलीस भरती जाहीर होणार .मा.शिंदे व मा.फडणवीस सरकार महाराष्ट्र राज्यात रखडलेली पोलीस भरती प्रक्रिया जोमाने सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.२०१९ पासून कोरोना महामारी मुळे भरती प्रक्रिया रखडली होती रखडलेली भरती प्रक्रिया पूर्ण करून आता नव्याने रिक्त पदांची जाहिरात लवकरच महाराष्ट्र राज्य गृह विभागामार्फत केला जाणार आहे नेमकी किती रिक्त जागा जाहीर होणार या बद्दलची संपूर्ण माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत हा लेख पूर्णपणे वाचा….

Maharashtra Police Bharti 2022

महाराष्ट्र पोलीस :

महाराष्ट्र राज्यात गृहखात्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे .महाराष्ट्र पोलीस यांच्यावर राज्याचे खूप सारे जबाबदारी आहेत, राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच तरुण वर्गांना भरती करून पोलीस दलाच्या  बळकटीकरणासाठी चे प्रस्ताव गृहविभागाने शासनासमोर सादर केला आहे,

या प्रस्तावाच्या माध्यमातून आत्तापर्यंत रखडलेली भरती प्रक्रिया आता सुरळीत होणार आहे.

यामुळे महाराष्ट्रातील तरुण वर्गामध्ये भरती होण्यासाठी ची खूप मोठी संधी उपलब्ध होणार आहे महाराष्ट्रातील बेरोजगार प्रमाणही याने कमी होणार .भरती प्रक्रिया लवकरच सुरू करणार आहे याबाबतची माहिती महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस त्यांनी स्वतः प्रसारमाध्यमांना माहिती दिले आहेत.

भरतीचे जागा ?

मित्रांनो महाराष्ट्र राज्यात लवकरच २०००० हजार पोलीस भारती करण्यात येणार आहे ही घोषणा

मा.उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी प्रसार माध्यमांसमोर सांगितले आहेत.

यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जे सन २०२० मध्ये रिक्त असलेले एकूण ७२३१ जागांची भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे .

त्यामध्ये गडचिरोली विभागातील पदे वगळून ६८८८ रिक्त पदांची जाहिरात ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.

ही भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित 12000 रिक्त पदांची जाहिरात सन २०२३ मध्ये सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *