Pik Vima Yojana 2022-Beed Pattern

Pik Vima Yojana 2022-Beed Pattern :

  • या शासन निर्णयानुसार राज्यांमध्ये राबविला जाणारा बीड पॅटर्न विमा कंपनीच्या नुकसान भरपाईपोटी ११० ट*क्के पेक्षा अधिक रक्कम त्याचा अतिरिक्त भार केंद्र शासन व राज्य शासन उचलणार आहे.
  • या निर्णयाचा जर विचार केला तर ज्यावेळी कंपनीला ८० ट*क्के पेक्षा कमी रक्कम शेतकऱ्यांना द्यावे लागते त्यावेळी मदत अधिक २० ट*क्के नफा ठेवून कंपनीला उर्वरित पैसे सरकारला द्यावे लागणार.
  • प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत रब्बी २०२२ शेतकऱ्यांचा हिस्सा एकूण याच्या १.५ ट*क्के इतका असणार.

पीक विम्याचे जोखीम स्तर :

  • शेतकरी मित्रांनो या कालावधीमध्ये जी पीक असतील त्या पिकांना विमा कंपनीमार्फत भरपाई दिली जाते .
  • हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाची पेरणी किंवा लावणे न झाल्यामुळे होणारे नुकसान .
  • हवामानातील प्रतिकूल परिस्थिती मुळे होणारे पिकांचे नुकसान
  • पावसाचा खंड असेल गारपीट यामुळे होणार नुकसान
  • पीक पेरणीपासून काढणीपर्यंत या कालावधीमध्ये नैसर्गिक चक्रीवादळ जमिनीचा भाग भूस्खलन दुष्काळ पावसातील खंड कीड-रोग इत्यादी बाबींमुळे होणारे नुकसान
  • अशा कारणे उत्पादनात येणारी घट होणारे पिकांचे नुकसान
  • नैसर्गिक कारणामुळे पिकांचे होणारे काढणीपश्‍चात नुकसान काढणे झाल्यानंतर तर पोस्टरवर काही नुकसान झालं तर ते सुद्धा ग्राह्य दरण्यात येणार .

पीक विमा रब्बी हंगाम २०२२ समाविष्ट पिक :

बागायत व जिरयत ज्वारी ,बागायत व जिरायत हरभरा ,उन्हाळी भात असे ४ प्रकारचे पीक आहेत.आणि नगदी पिकामध्ये रब्बी कांदा पिकांचा समावेश रब्बी हंगामासाठी करण्यात आलेला आहे

रब्बी हंगाम पीक विमा शेतकर्‍याचा हिस्सा :

शेतकऱ्यांसाठी तर अन्नधान्य आणि गळीत धान्य पिकासाठी १.५ ट*क्के नगदी पीक आहे त्याच्यामुळे कांद्याचे पीक रब्बी हंगामासाठी यांच्यासाठी ५ ट*क्के त्याला भरावा लागणार .

पिक विमा भरण्यासाठी लागणारे कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • स्वघोषित पीक पेरा प्रमाणपत्र
  • जमिनीचा ७/१२ व ८अ

वरील सर्व कागदपत्रे पिक विमा फॉर्म भरताना आपणाजवळ असणे आवश्यक आहे करण्यासाठी आपणास बँक किंवा सीएससी सेंटर( आपले सरकार सेवा केंद्र) या ठिकाणी जाऊन तुम्ही पिक विमा फॉर्म ऑनलाईन करू शकता.

पिक विमा रब्बी हंगाम २०२२ अंतिम तारीख :

  • रब्बी ज्वारी( बागायत व जिरायत) – ३० नोव्हेंबर २०२२
  • गहू बागायत, हरभरा, रब्बी कांदा – ३० डिसेंबर २०२२
  • उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग -३१ डिसेंबर २०२२

पिक विमा संदर्भाचा हा महत्त्वपूर्ण लेख तुम्हाला जर आवडले असेल तर इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा.

error: Content is protected !!
Scroll to Top