नवीन विहीर अनुदान योजना सुरू MRGS मधून मिळणार ४ लाख अनुदान, Vihir Yojana Online Form

Vihir Anudan Yojana Online Form

नवीन विहीर अनुदान योजना सुरू MRGS मधून मिळणार चार लाख अनुदान :-

नमस्कार मित्रांनो राज्यातील प्रत्येक कुटुंबाला लखपती करण्याचा उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामीण भागामध्ये सिंचन विहिरीचे कामे गतीने पूर्ण व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत ४ नोव्हेंबर २०२२ रोजी महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. राज्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार अंतर्गत शेतकऱ्यांसाठी विविध अनुदान दिले जाते जसे की फळबाग लागवडीसाठी अनुदान, घरकुल बांधकामाच्या वेळी दिला जाणारा अनुदान,त्याच बरोबर विहीर पुनर्भरण करण्यासाठी, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवीन विहीर खोदण्यासाठी व सिंचनाची सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी MRGS च्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते, मागेल त्याला विहीर योजना  अनुदान नेमकं काय आहे या बद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या लेखामध्ये जाणून घेऊ यात तरी हा लेख संपूर्ण वाचा.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना :-

या योजनेमध्ये कालपरत्वे बदल करण्यात आले आहे .अलीकडच्या काळात वैयक्तिक लाभावर अधिक प्रमाणात शासनामार्फत भर  दिले जात आहे अलीकडेच वैयक्तिक कामांमध्ये किमान ६० ट*क्के निधी खर्च करण्याचे निर्देश भारत सरकारकडून प्राप्त झाले आहे अर्थात मनरेगा फक्त रोजगार देणारी योजना नसून विकासात भर घालणारी योजना आहे मागील काही काळापासून महाराष्ट्र राज्याने या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला लखपती करण्याचे लक्ष ठेवले आहे .भूजल सर्वेक्षण अनुसार ३,८७,५०० विहिरी खोदणे आहे या योजनेअंतर्गत या विहिरी पाण्या पासून  किफायतशीर वापर होऊन ठिबक व तुषार सिंचनाच्या साहाय्याने शेतकरी ही कुटुंबे लखपती होऊ शकतील शेतकऱ्यांचा आर्थिक स्थिती उंचावण्यास मदत होईल.(पंचायत समिति विहीर योजना )

नवीन सिंचन विहिरीची कामे मंजूर :-

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीचे कामात कार्यवाही करताना काही अडचणी येत असल्याचे शासनाने निदर्शनास आल्याने त्यामध्ये योग्य ते बदल करण्याचा शासनाच्या विचाराधीन होता या GR च्या माध्यमातून येणारा अडचणी योग्य  मार्गी लावून नवीन विहिरी खोदण्यास अनुदान प्रक्रिया मार्ग मोकळा करण्यात आलं आहे .विहीर योजना  २०२२ 

शासन निर्णय :

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीचे कामे करताना कार्यालयास येत असलेल्या अडचणी दूर करण्याच्या अनुषंगाने या  संदर्भात पुढील कारवाई करण्यास सूचना देण्यात आले आहेत.

नवीन विहिरी लाभार्थी निवड प्रक्रिया:
  • अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थींना असावं
  • भटक्या जमाती
  • विमुक्त जमाती
  • लाभार्थी दारिद्रय रेषेखालील असावं
  • स्त्री करता असलेले कुटुंब
  • शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती करता असलेले कुटुंब
  • जमीन सुधारणा चे लाभार्थी इंदिरा आवास योजना

     

  विहिरीसाठी अर्ज जोडावयाची

कागदपत्रे सविस्तर माहितीसाठी

👉येथे क्लिक करा👈

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top