PM Kisan Yojana Beneficiary Status मधील महत्वाचे मुद्दे :
- Beneficiary Status मधील पर्याय मध्ये Payment Mode पर्याय चेक करा .
- या ठिकाणी जर तुम्हाला Payment Mode जर Aadhar दिसत असेल .तर
- आपले pm kisan yojana चे २००० रु ,हप्ता जे बँक खाते क्रमांक आधार NPCI ला लिंक आहे .त्या बँक खातेत जमा झाले असणार .
- पण Payment Mode : Account असं जर दिसत असेल तर आपले पैसे जे ०१ हप्ता ते १० वा हप्ता पर्यत ज्या बँक खातेत जमा होत होते त्याचं बँक खातेत जमा झाले असणार .
आधार कार्ड कोणत्या बँक खाते क्रमांक लिंक आहे असं चेक करा ?
Aadhar Linking Status With Bank :
मित्रानो केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामार्फत शेतकऱ्यांना जी काही अनुदान आज काल दिले जात आहे हे सर्व अनुदान DBT च्या माध्यमातून जमा केले जात आहे, जे काही योजनेचे लाभार्थी आहेत त्यांचा बँक खाते क्रमांक आधार NPCI संकेत स्थळाला लिंक आहे त्याच बँक खाते मध्ये पैसे जमा केले जातात. आता PM KISAN YOJANA चा १२ वा हप्ता आधारशी लिंक असलेल्या खात्यामध्ये केंद्र शासनाने जमा केला आहे.
महत्वाचे टीप : आधार NPCI कोणती बँक खाते क्रमांक लिंक आहे हे पाहण्यासाठी आपला मोबाईल क्रमांक आधार कार्डची लिंक करणे आवश्यक आहे.
असं चेक करा Aadhar Bank Linking Status :
- आधार UIDAI च्या अधिकृत संकेतस्थळ ओपन करा .
- https://uidai.gov.in/
- वरील संकेतस्थळ मध्ये My Aadhar मधील Check Aadhar/ Bank Linking Status या पर्याय वर क्लिक करा .
- त्या ठिकाणी आधार क्रमांक टाकून ,Captcha code टाका .
- Send Otp वरती क्लिक करा .
- आधार लिंक मोबाइल क्रमांक वर OTP जाईल .ते ६ अंकी असेल .
- खलील बॉक्स मध्ये OTP टाकून Submit बटन वर क्लिक करा .
- नवीन पेज ओपन होईल आणि त्या मध्ये आधार कार्ड शी लिंक असलेल बँक खाते दिसेल .
- ज्या बँक खाते क्रमांक या ठिकाणी दर्शवेल त्या बँकेत जाऊन चेक करा .