५०००० रु.प्रोत्साहन पर अनुदान दुसरी यादी :
राज्यातील एकूण पात्र लाभार्थी पैकी पहिली यादी ही ८ लाख ३० हजार शेतकर्याची प्रसिद्ध करण्यात आली आजून बरेच सारे लाभार्थ्या यामध्ये पात्र आहेत परंतु त्यांचे पहिले यादी मध्ये नाव नाहीत आणि अश्या लाभार्थ्यांना आता उत्कंठा लागलेला आहे . ही योजना एकूण तीन टप्प्यांमध्ये ही योजना राबवली जाईल अशा प्रकारे माहिती देण्यात आली आहे .
५०००० रु.प्रोत्साहन पर अनुदानास तुम्ही पात्र आहात का ?
५०००० रु.प्रोत्साहन पर अनुदान आता पर्यतचा विवरण :
५०००० रु.प्रोत्साहन पर अनुदान साठी ४७०० कोटी रुपयांचा निधी पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आलेला आहे त्यापैकी ३ हजार कोटी रुपये शासन निर्णय GR काढून त्या वित्तलेखाच्या खाली वितरित करण्यात आलेले आहेत .आणि त्यापैकी २५०० कोटी रुपये वितरण आता पर्यत झालेलं आहे .अद्याप देखील २२ कोटी निधी शासनाकडून मंजूर झालेले निधीपैकी शिल्लक आहे. त्याच्यामुळे आता लवकरच दुसरी ही यादी प्रकाशित करून या यादीच्या अंतर्गत पात्र झालेल्या लाभार्थ्यांना ही ५०००० रु.प्रोत्साहन पर अनुदान दिलं जाणार .शेतकरी मित्रांनो दुसरी यादी हे नोव्हेबर च्या सुरुवातीला जाहीर होईल अशी माहिती मिळती आहे .