या योजने अंतर्गत या मुलांना प्रति महिन्याला २२५० रुपये मिळणार ! Krantijyoti Savitribai Fule Balsangopan Yoajana

Krantijyoti Savitribai Fule Balsangopan Yoajana :-
नमस्कार मित्रांनो,आपल्या राज्यात एकल पाल्यांना विशिष्ट आर्थिक मदत केले जाते.ती योजना कोणती ? या संदर्भात संपूर्ण माहिती लेखात पाहणार आहोत.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपान योजनेतून एकल पालक असणार्या मुलांना आता ०२ हजार २५० रुपये मिळतात.या पूर्वी शासन मार्फत ११०० रुपये दिले जात होते.त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी पालकांना महिला व बालकल्याण विभागाकडे अर्ज करावे लागतो.
याचं लाभ हे विधवा,घटस्फोटीत महिला तसेच अनाथ बालकांना होता.त्यांच बरोबर महिला व एकात्मिक बालविकास विभागाच्या कार्यालयात (पंचायत समिती) कुटुंब संरक्षण अधिकारी यांच्याकडून अर्ज पूर्ण भरून तालुका स्तरावर तपासून घ्यावा .जिल्हातील ठिकाणी बालकल्याण समितीसमोर मुलांना समक्ष नेऊन फॉर्म जमा करणे आवश्यक आहे .राज्यात या योजनेच्या लाभार्थी संख्या कोरोंनानंतर वाढ झाली.योजनेचा लाभ हे गरजू व खरोखर लाभार्थीना देण्यात येते.या ठिकाणी पालकांचे उत्पन्न एक लाख रुपये पर्यंत असणे आवश्यक आहे .एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यात ५८०० लाभार्थी लाभ घेत आहेत .
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपान योजना :-
नियम व अटी :-
- ज्या मुलांना एक पालक असतील ,अर्थात ज्या मुलांचे आई किंवा वडील वारले असतील अशा एक पालक मुलांना ,खूप मोठ्या आजारी त्रस्त (कॅन्सर व HIV) अश्या पालकच्या मुलांना ,तुरुंगात असलेल्या कैदयाच्या मुलांना ही योजना मिळतो .
- अशा पालकांच्या कोणत्याही दोन मुलांना वयाची १८ वर्ष पूर्ण होईपर्यात प्रत्येकी महिनेला २२५० रुपये मिळतात .
- दोन्ही मुलांचे स्वतंत्र फॉर्म भरावा लागतो .
- घटस्फोटीत महिल्याच्या मुलानाही हा लाभ मिळतो .(घटस्फोटीत झालेले ठोस पुरावे सादर करावे लागतील)
Balsangopan Yoajana आवश्यक कागदपत्रे :-
- विहित नमुन्यातील अर्ज
- पालकांचे व बालकांचे आधार कार्ड झेरॉक्स
- मुलांचे शाळेचे बोनफाईड सर्टिफिकेट
- तहसिलदार कडून प्राप्त उत्पन्न दाखला (लाभार्थी मुलांचे नांव आवश्यक)
- पालकांचे मृत्यू असल्यास मृत्यू दाखला
- पालकांचा रहिवाशी दाखला (ग्रामपंचायत /नगरपालिका कडून )
- मुलांचे बँक पासबूक झेरॉक्स यांचे नसेलतर हाहयात पालकांचे
- मृत्यू अहवाल (कोविडने जर मृत्यू झाला असेल तर मृत्यू अहवाल )
- रेशन कार्ड झेरॉक्स
- घरासमोर पालकसोबत बालकांचा फोटो साईज ४ बाय ६ फोटो पोस्ट कार्ड
- दोन मूल असल्यास स्वतत्र फोटो
- id साईज तीन फोटो प्रत्येकी
ही योजना एखादा सुरू झाल्यानंतर प्रत्येकी वर्षी नूतनीकरण करणे आवश्यक आहे .या संदर्भात अधिक माहिती हे जिल्हा महिला व बालकल्याण विभाग ,महिला व एकात्मिक बालविकास विभाग या ठिकाणी मिळेल .
सौजन्य : सकाळ वृत्तसेवा