RTE Admission 2024 चे अर्ज नव्याने भरावे लागणार ! प्रवेश प्रक्रिया नियमात पुन्हा फेरबदल,शेवटची तारीख ?
RTE Application Form Deleted 2024 :-
नमस्कार मित्रांनो,शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये RTE २५% अंतर्गत आपल्या पाल्याचे प्रवेश निश्चित करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केलेल्या पालकांना आता पुन्हा अर्ज करावे लागणार आहे कारण या वर्षी नियमात काही बदल करण्यात आले होते ,असे की मुलाच्या घरा पासून ३ Km अंतरा पर्यत मराठी शाळा असल्यास अर्ज करताना इंग्रजी शाळा निवडता येत नव्हता .या मुळे बरेच ऑनलाइन फॉर्म त्रुटी मध्ये निघत होत,पण आता या नियमाला कोर्ट कडून स्थगिती देण्यात आली आहे .
त्यावेळी या अगोदर जेवढे ऑनलाइन फॉर्म भरले होते ते सर्व काढून टाकण्यात आले आहे .पालकांना आता पुन्हा नव्याने अर्ज भरावे लागणार आहे.RTE Admission 2024 Date आता नवीन अर्ज १७ मे २०२४ सुरू होणार आहे.हे अर्ज गेल्या वर्षी ज्या नियमा प्रमाणे अर्ज केले जात होते त्या पद्धतीने स्वीकारले जाणार आहे पालकांना आता ३ km पुढील इंग्रजी माध्यम शाळा निवडता येणार आहे .
RTE Admission 2024-25 :-
अर्ज भरताना मुलाचं आधार कार्ड क्रमांक ,पालकांचा मोबाइल क्रमांक ,घराचा लोकेशन ,जात प्रमाण पत्र माहिती ,अपंग असल्यास त्या संदर्भाची माहिती व्यवस्थित आणि अचूक भरणे गरजेचं आहे. RTE 25% Admission form एप्रिल महिन्यात ज्यावेळी अर्ज करत होते लोकेशन प्रमाणे इंग्रजी माध्यम शाळा लिस्ट मध्ये दर्शवत नव्हेत .पण आता तसं नाही होणार मित्रांनो .