नमस्कार मित्रांनो, आज-काल सर्व काही मोबाईलच्या साह्याने व्यवहार केला जात आहे. डिजिटल युगात कोणतेही काम करण्यास मोबाइलला प्रथम प्राधान्य दिला जात आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये मोबाईलचा वापर अधिकाचा केला जात प्रत्येक विभागामध्ये नागरिकांना आपली सुविधा चांगल्या पद्धतीने कसे देता येईल यासाठी विशेष काही सुविधा उपलब्ध केले जात आहेत त्यामधला एक भारतीय स्टेट बँक आपल्या खातेदारांना मिस-कॉल च्या माध्यमातून, तसेच व्हाट्सअप त्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध करून दिले आहे. पूर्वीसारखे बँकेत जाऊन आपल्या खात्यासंबंधी माहिती घेण्याची गरज नाही. आता सर्व काही मोबाईलच्या साह्याने शक्य होणार.
State Bank Of India New Update :
भारतीय स्टेट बँक आता त्यांच्या खातेदारांना व्हाट्सअप च्या सुविधा उपलब्ध करुन दिले आहे त्याचबरोबर मिस कॉल ची सुविधा उपलब्ध आहे, या बँकेतील खातेदारांना बँकेमार्फत दिलेल्या नंबर वरती मिस्ड कॉल केल्यानंतर ना त्यांचे सर्व बँक बॅलन्स, मागील ५ व्यवहार माहिती सर्व काही आता पाहता येणार आहे. आपण ज्यावेळी विशिष्ट सुविधांचा लाभ घेण्यासाठी बँकेने दिलेल्या नंबर वरती मिस कॉल करतोय, काही सेकंदांमध्ये आपल्याला आपल्या खाते संबंधी माहिती एसएमएसच्या माध्यमातून प्राप्त होते.
भारतीय स्टेट बँक कडून खालील मिसकॉल सेवा उपलब्ध :
- भारतीय स्टेट बँक खाता व्हाट्सअप सर्विस उपलब्ध केल आहे
- आपल्याला जर बँक खात्यातील शिल्लक पाहायचं असेल तर 9223766666 या नंबर वरती मिस्ड कॉल द्या,
- काही सेकंदांमध्ये तुमचे बचत खाते मधील शिल्लक रक्कम माहिती SMS प्राप्त होईल.
- आपण केलेल्या शेवटचे ५ व्यवहार (Last 5 Transactions) पाहायचे असेल तर 09223866666 या नंबर
- वरती मिस्ड कॉल द्या, कॉल दिल्यानंतर एसएमएसच्या माध्यमातून तुम्ही केलेल्या मागील ५ व्यवहार संपूर्ण माहिती प्राप्त होईल.
SBI WhatsApp बँकिंग सेवेसाठी नोंदणी प्रक्रिया
बद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी
टीप :
मित्रांनो वरील सुविधांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला आपल्या बँक खात्याशी आपला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. आपण करत असलेल्या फोन पे, गुगल पे, यावरून झालेल्या व्यवहाराची माहिती मुळे आपला जर पासबुक वारंवार भरत असेल, आणि तुम्ही केलेले व्यवहार पाहण्यास अडचण येत असल्यास, तुमच्या बँक खात्याशी तुमचा मेल आयडी अद्यावत करा, ३० दिवसानंतर ना महिनाभरातील सर्व व्यवहाराची स्टेटमेंट आपण रजिस्टर केलेल्या मेल च्या माध्यमातून बँकेमार्फत पाठवले जाते, आपण सहज रित्या आपण केलेल्या व्यवहाराची संपूर्ण माहिती पाहता येते.