पीएम किसान आणि नमो शेतकरी ,या कारणामुळे शेतकर्‍यांचे हफ्ते नाही आले ! Namo Shetkari Yojana 2nd & 3rd Installment Receive Problem

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माहे डिसेंबर २०२३ ते मार्च २०२४ कालावधी मधील १६ वा हप्ता मा.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी दिनांक २८ फेब्रुवारी २०२४ रोजी यवतमाळ येथील समारंभात वितरित करण्यात आला.Pm Kisan यावेळी देशातील सर्व नागरिकांना पीएम किसान योजनेचा १६ व्या हफ्तेचे रु.२००० तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत ०२ व ०३ हप्ता मिळून ४००० रुपये असे एकूण ६००० रुपये चा लाभ मिळाला. राज्यातील सुमारे 88 लाख पात्र शेतकरी कुटुंबांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हे रक्कम थेट जमा आले.

Namo Shetkari Yojana 2nd & 3rd Installment Beneficiary Status : –

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी फेब्रुवारी २०१९ पासून सुरू करण्यात आली.या योजनेच्या निकषानुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास पती-पत्नी व (त्यांच्या १८ वर्षाखालील आपत्ये) यांना वर्षात समान तीन हप्त्यामध्ये वार्षिक सहा हजार रुपये हे आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात लाभ जमा करण्यात येतात. पीएम किसान योजनेअंतर्गत २४ फेब्रुवारी २०२४ अखेर राज्यातील ११३.६० लाख शेतकरी कुटुंबांना एकूण १५ हप्त्यांमध्ये २७६३८ कोटीचा लाभ देण्यात आला आहे.

नमो शेतकरी योजना हफ्ते कोणाला मिळाले ? 

पीएम किसान योजनेच्या १६वा हफ्ते करिता राज्यातील ज्या शेतकऱ्यांचे भूमि अभिलेख नोंदणी अद्यावत आहेत,बँक खाते आधार संलग्न केलेले, इ-केवायसी पूर्ण केलेल्या ८७.९६ लाख शेतकरी कुटुंबांना रु.१९४३.४६ कोटीचा वितरित करण्यात आले .राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा याकरिता राज्य कृषी विभाग अंतर्गत गाव पातळीवर विशेष मोहीम घेऊन  राज्यातील सुमारे १८ लाख लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेच्या लाभासाठी आवश्यक बाबींची पूर्तता केलेली आहे त्यामुळे या लाभार्थ्यांना पीएम किसान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची दुहेरी लाभ मिळणे शक्य झाले आहे.

दोन्ही योजने अंतर्गत किती निधी वितरित :- 

राज्यात सन २०२३-२४ पासून पीएम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महा-सन्मान निधी योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे या योजनेअंतर्गत पीएम किसान योजनेस पात्र असणारे शेतकरी नमो शेतकरी महा-सन्मान निधी योजनेस पात्र असतील, नव्याने सुरू करण्यात आलेल्या या योजने करिता राज्यातील ८५.६० लाख शेतकरी कुटुंबांना पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे त्याकरिता सुमारे १७१२ कोटी रुपये राज्य शासनामार्फत खर्च करण्यात आला. त्यानंतर सन २०२३-२४ मधील उर्वरित दुसरा हप्ता करिता १७९२ कोटी, तिसरा हत्या करिता २००० कोटी रुपये असे निधी उपलब्ध करून देण्यात आले.

पीएम किसान आणि नमो शेतकरी ,या कारणामुळे शेतकर्‍यांचे हफ्ते नाही आले ? 

  • २८ फेब्रुवारी २०२४ तारखेला वितरित झालेला हप्त्यामध्ये काही शेतकऱ्यांना दोन हजार रुपये प्राप्त झाले तर काही शेतकऱ्यांना ६००० रुपये मिळालेत.
  • ज्या शेतकऱ्यांना एकूण ६००० रुपये प्राप्त झालेले त्यांना पीएम किसान योजना व नमो शेतकरी महा-सन्मान निधी योजनेचे दोन्ही हप्ते प्राप्त झालेले आहेत
  • ज्या शेतकऱ्यांना फक्त दोन हजार रुपये जमा झाले याचा अर्थ त्या शेतकऱ्यांना फक्त पी एम किसान योजनेच जमा झाले.
  • जे शेतकरी नव्याने पीएम किसान रजिस्ट्रेशन केलेले आहेत अशा शेतकऱ्यांना या योजनेचा सोळावा हप्ता प्राप्त झाला या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळाला नाही.
  • याच कारण पीएम किसान योजनेच्या संकेतस्थळावरील माहिती राज्य शासनाच्या आयटी महामंडळाकडे अपडेट होण्यास विलंब होत असल्याकारणाने त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नसावा .
  • शासनाच्या अटी व शर्ती पूर्ण केले नसतील या कारणे
  • पण पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्ता बरोबर नमो शेतकरी महा-सन्मान निधी योजनेचे हप्ते मिळण्याचे शक्यता आहे.

नमो शेतकरी हप्ता मिळाला का ?चेक करा 

👉येथे क्लिक करा👈

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top