Ration Card Exists But HOF/NFSA Head Is Not Verified.रेशन कार्ड मधील पब्लिक लॉगिन मध्ये येणारा हा प्रॉब्लेम ,त्यावरील उपाय
Ration Card Exists But HOF/NFSA Head Is Not Verified :-
नमस्कार मित्रांनो ,शिधापत्रिका संदर्भात महाराष्ट शासना च्या माध्यमातून वेळो वेळी अपडेट करण्यात येत आहे.सर्व सामान्य नागरिकांना सहजरित्या रेशन कार्ड काढता यावं ,त्या बरोबर युनिट वाढ,युनिट कमी,रेशन कार्ड मधील नांव काढणे याकरिता शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली मध्ये (RCMS) या संकेस्थळावर Public Login उपलब्ध करून देण्यात आला आहे .
RCMS राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या लाभार्थी करिता QR Code आधारित ई -शिधापत्रिका ऑनलाईन तसेच डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.अंत्योदय अन्न शिधापत्रिका(AAY), प्राधान्य कुटुंब योजना (PHH) व राज्य योजनेअंतर्गत (APL Farmer) राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना (NPH) अशा सर्व शिधापत्रकाधारक लाभार्थ्यास संदर्भाधिन शासन निर्णय १६ मे २०२३ रोजी (GR)अन्वये शिधापत्रिका सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
Ration Card Modification Maharashtra :-
याअंतर्गत राज्यातील नागरिकांना नवीन शिधापत्रिका अर्ज करणे,शिधापत्रिकेतील पत्ता बदलणे, नाव वगळणे किंवा समाविष्ट करणे अशा शिधापत्रिका विषयी अनेक प्रकारचे सेवा आता ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे त्यासाठी RCMS या संकेतस्थळावर पब्लिक लॉगिन उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.या पब्लिक युजर (नागरिक लॉगिन) करताना त्यांना एक एरर(error) येत आहे .त्या एरर चा सोल्युशन कोणत्या ठिकाणी गेल्यास ok होईल या संदर्भात संपूर्ण माहिती या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत तरी हा पोस्ट संपूर्ण वाचा.
Ration Card HOF/NFSA Error : –
मित्रांनो नवीन शिधापत्रिका /दुय्यम शिधापत्रिका /शिधापत्रिकेत नवीन सदस्य वाढवणे ,कमी करण्यासाठी या संकेतस्थळ चा वापर करू शकता 👉🏿https://rcms.mahafood.gov.in👈🏿 सन २०२३ च्या ‘मे’ महिन्यात ऑनलाइन रेशन बाबत प्रथम निर्णय घेण्यात आला .त्या मध्ये खूप एरर येत होते त्यात सुधारणा करून नवीन मार्गदर्शक Module २० डिंसेबर २०२३ प्रसिद्ध करण्यात आला.(GR) आता प्रॉब्लेम या ठिकाणी येतो की, वरील वेबसाईट ओपन करून पब्लिक लॉगिन केल्यावर खाली दाखविल्या प्रमाणे पेज ओपन होते या ठिकाणी
RC नंबर टाकून लॉगिन करण्याचा प्रत्यत्न केला तसेच अगोदर फॅमिली हेड नांवे रजिस्टर करून लॉगिन केले तर Ration Card Exists But HOF/NFSA Head Is Not Verified हा error येतो , काही जणांना लॉगिन होतो पण त्यामध्ये Ration Card Modification option काम करत नाही.त्यामुळे युजरला शिधापत्रिकेत नवीन सदस्य वाढवणे ,कमी करणे ,मोबाइल क्रमांक अपडेट ,इतर माहिती भरता येत नाही .
HOF/NFSA error बाबत उपाययोजना :-
या समस्यासाठी तुम्ही आपल्या तहसिल कार्यालय येथील पुरवठा विभागातील मुख्य अधिकारी यांना समक्ष भेटून आपले १२ अंकी RC नंबर देऊन व्हेरिफाय करून घ्या (म्हणजे HOF Verify) ही प्रकिया झाल्यानंतर आपणास लॉगिन मध्ये सर्व बदल करता येईल .
रेशन कार्ड RC नंबर काढण्यासाठी