नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी आणि सिंचनासाठी स्त्रोत उपलब्ध करून देण्यासाठी तसेचं शेती क्षेत्रामध्ये डिझेल मुक्त करण्यासाठी भारत सरकारने महाकृषि ऊर्जा अभियान प्रधानमंत्री कुसुम योजना सुरू केली आहे.महा-कृषी ऊर्जा अभियान कुसुम योजना अंतर्गत कृषी पंप मागणी करिता, जे शेतकरी सन २०२२-२३ या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले होते.
अशा शेतकऱ्यांना महा-ऊर्जा कडून सेल्फ सर्वे करण्यासाठी SMS पाठवले जात आहे. तुम्ही हे अर्ज केला असाल तर महा-ऊर्जाच्या बेनिफिश्री लॉगिन करून पहा. लॉगिन केल्यानंतर तुमच्या लॉगिन मध्ये वर्चुअल अकाउंट नंबर (Virtual Account Number) दिसत असेल तर आपणास कोटेशन उपलब्ध झाल्याचा दिसेल. कोटेशन डाऊनलोड केल्यानंतर लॉगिन मध्ये शेतकऱ्यांना सेल्फ सर्वे करण्याचा लिंक देण्यात येत आहे.
Pm Kusum Solar Self Survey Online :-
लॉगिन केल्यानंतर कोटेशन मध्ये तुम्ही किती HP साठी अर्ज केला होता त्याचा लाभार्थी हिस्सा रक्कम किती असणार तसेच लाभार्थ्यांना योग्य ते सूचना यामध्ये देण्यात आले आहेत.शेतकरी मित्रांनो कोटेशन तपशील डाऊनलोड केल्यानंतर मग आपणास सेल्फ सर्वे करायचा आहे.
Pm Kusum solar सेल्फ सर्विस झाल्यानंतर लॉगिन मध्ये पेमेंट ऑप्शन ऍक्टिव्ह होईल. सेल्फ सर्वे नंतर कृषी पंपाचा लाभार्थी रक्कम ०७ दिवसाच्या आत भरणे बंधनकारक आहे. या कालावधीमध्ये लाभार्थी हे रक्कम जमा न केल्यास महा ऊर्जेच्या माध्यमातून अर्ज निकाली काढण्यात येते.
शेतकार्याने दाखल केलेल्या कागदपत्राच्या प्रत्यक्ष स्थळ पाहणी अधीन राहून महा-ऊर्जा आपले अर्ज मान्य करतो ज्यावेळी प्रत्यक्ष स्थळ पाहणे केल्यानंतर निकषात न बसणारे लाभार्थी प्रस्ताव रद्द करण्यात येते. अशा वेळी लाभार्थी जमा केलेले रक्कम लाभार्थी दिलेल्या बँक खात्यामध्ये परत जमा केली जाते.
Kusum Solar Self Survey:-
टीप :- महा कृषी ऊर्जा अभियान कुसुम योजनेअंतर्गत कृषी पंप मागणी करिता महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महा ऊर्जा) यांच्याकडून लाभार्थी शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार केलं जात नाही याची नोंद घ्यावी.
सेल्फ सर्वे अशा पद्धतीने करा :-
- लॉगिन मध्ये दिलेला लिंक वर क्लिक करून मेडा बेनिफिशरी (MEDA BENEFICIARY APP)चा मोबाईल आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा.
- मोबाईल ॲप ओपन करा ओपन केल्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांसाठी आवश्यक ती माहिती आपणास दिली आहे.
- काळजीपूर्वक सर्व माहिती वाचून नेक्स्ट बटनावर क्लिक करा.
- आपले लोकेशन बरोबर येण्यासाठी इमर्जन्सी लोकेशन ऑफ करा.
- सेल्फ सर्वे तुम्ही ऑफलाइन पद्धतीने पण करू शकता.
- ऑफलाइन पद्धतीने सर्वे करून सर्वे चा डाटा नंतर अपलोड करू शकता.
- आपणास पुढे रजिस्टर मोबाईल नंबर विचारण्यात येईल.
- त्या ठिकाणी नोंदवा खालील चेक बॉक्समध्ये टिकमार्क करून समोर दिसणाऱ्या बाणचीन वर क्लिक करा.
- रजिस्टर नंबर बरोबर असल्यास लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती त्याबरोबर otp आपणांसमोर दर्शवेल.
- दिसणारी माहिती बरोबर असल्यास ALLOW या बटणावर क्लिक करा.
- MEDA BENEFICIARY APP चा डॅशबोर्ड आपल्यासमोर ओपन होईल.
- या ठिकाणी आपलिकेशन डिटेल्स पहिल्या पर्यायावर क्लिक करा.
- पहिल्या ऑप्शनमध्ये आपणास वापरत असलेल्या नेटवर्क संदर्भात असणार या ठिकाणी कोणत्या कंपनीचा नेटवर्क तुम्ही वापरत आहात ते कंपनी निवडून YES या ऑप्शन वर क्लिक करा.
- या अगोदर सोलर योजनेअंतर्गत आपण लाभ घेतला आहे का NO या ऑप्शन निवडा.
- तुमच्याकडे उपलब्ध सिंचन स्त्रोत कोणता आहे बोर अथवा वीर असल्यास हा पर्याय निवडा.
- लाभार्थी शेतकऱ्यांच्या नावे AGवीज कनेक्शन आहे का या ठिकाणी No हा पर्याय घ्या
- यानंतरनं खाली आपणास तीन फोटो घ्यायचे आहेत.
- पहिला सिंचन स्त्रोताबरोबर लाभार्थी फोटो
- बोरवेल अथवा विहिरीचा फोटो
- तिसरा आपल्या शेत जमिनीचा फोटो
- हे सर्व फोटो घेतल्यानंतर ना खाली सिग्नेचर हेअर या पर्यावरण क्लिक करा
- लाभार्थ्यांचा सही घ्या त्या ठिकाणी
- खालील सबमिट या ऑप्शनवर क्लिक करा.
तुम्ही केलेलं सेल्फ सर्वे यशस्वीरीत्या सबमिट झाल्यावर त्या मोबाईल ॲप मध्ये आपणास पेमेंट ऑप्शन ऍक्टिव्ह झाल्याचा दिसून येईल.
पीएम कुसुम योजना घटक-ब सेल्फ सर्वे
अजून सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी खालील लिंक वरील व्हिडिओ पहा.