पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना या प्रवर्गातील नागरिकांना मिळणार लाभ ,अर्ज ,पात्रता ,कागदपत्रे | Punyashlok Ahilyadevi Gharkul Yojana

Ahilyadevi Holkar Gharkul Yojana 2023 :-

नमस्कार महाराष्ट्रातील गरजूवंत नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा याकरिता राज्य शासना मार्फत वेगवेगळे घरकुल योजना सध्या राबविले जात आहेत.SBC व OBC प्रवर्गासाठी मोदी आवास घरकुल योजना ही योजना राबविली जात आहे.राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये या योजनेअंतर्गत या प्रवर्गातील पात्र लाभार्थ्याकडून अर्ज मागविले जात आहे. याच योजनेप्रमाणे आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना राज्यामध्ये राबवले जात आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्याकडून अर्ज मागविले जात आहे.gharkul yojana

Gharkul Yojana 2023 :-

इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत भटक्या जमाती व क प्रवर्गातील धनगर समाजासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना राबविण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत सन २०२१-२२ व सन २०२२-२३ यामध्ये शासनास प्राप्त झालेल्या प्रस्तावा वर प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून या योजनेसाठी निधीही वितरित करण्यात आला.ahilyadevi holkar gharkul yojana

सन २०२३-२४ या वित्त वर्षात एकूण २५ हजार घरकुलांना मान्यता देण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्या अनुषंगाने भटक्या जमाती, क प्रवर्गातील धनगर समाजासाठी राबविण्यात येत असलेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सद्यस्थितीमध्ये सोलापूर जिल्ह्यात या योजनेअंतर्गत अर्ज मागविले जात असून अर्जाची हार्ड व सॉफ्ट कॉपी कार्यालयास १० जानेवारी २०२४ पर्यंत सादर करण्यास मुदत देण्यात आली आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना कागदपत्रे:-

  • विहित नमुन्यातील अर्ज
  • ग्रामसभेचा ठराव
  • सक्षम प्राधिकारी यांच्याकडील जातीचा दाखला
  • माननीय तहसीलदार यांच्याकडील उत्पन्नाचा दाखला
  • लाभार्थ्यांचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान पंधरा वर्षे असलेले रहिवासी दाखला ( डोमेशियल  सर्टिफिकेट )
  • गावठाण मधील जागेचा उतारा
  • कायमस्वरूपी रहिवासी व यापूर्वी कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतला नसल्याचा दाखला
  • कुटुंब रेशन कार्ड
  • लाभार्थी आधार कार्ड बँक पासबुक झेरॉक्स
  • मनरेगा जॉब कार्ड

या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेचा नमुना फॉर्म पाहू शकता.

सदरचा फॉर्म प्रिंट आउट करून आपणास ग्रामपंचायत येथे सादर करावे लागणार या योजनेच्या अधिक माहितीसाठी आपल्या ग्रामपंचायत ग्रामसेवक यांना भेटा.

आशा करतो की हा पोस्ट तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरेल,पोस्ट जर आवडला असेल तर इतर मित्रांना नक्की शेअर करा  धन्यवाद

👇👇👇👇

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

घरकुल योजना अर्ज Pdf

👉येथे चेक करा👈

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top