आता 7/12,8अ बरोबर वारस नोंद ही ई-सेवा केंद्रातून करता येणार फक्त २५ रुपयात GR.|Land Record Old Document in 25 Rupees

Land Record Old Document in 25 Rupees :-

नमस्कार मित्रांनो महसूल विभाग अंतर्गत उपलब्ध असलेले अभिलेख सेतू / आपले सरकार सेवा केंद्र / महा-ई-सेवा केंद्र यांच्यामार्फत उपलब्ध करून देणे व ई-हक्क प्राणीद्वारे अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत दिनांक ०५ डिसेंबर २०२३ रोजी शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा GR निर्गमित करण्यात आला आहे. या संदर्भाची सविस्तर माहिती या लेखात आपण पाहणार आहोत.

Land Record Old Document :-

तलाठी कार्यालयात मिळणाऱ्या ७/१२,८अ, फेरफार आता सर्वसामान्य शेतकऱ्यांना हे सर्व सुविधा महा-ई-सेवा, आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी मिळणार यासाठी शेतकऱ्यांना फक्त  २५ रुपये शुल्क मोजावे लागणार ,तसेच या ऑनलाइन सुविधाच्या माध्यमातून वारस नोंद, मयताचे नाव कमी करणे, बोजा चढवणे,कमी करणे अशा प्रकारच्या अर्जासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही.

हे सर्व प्रकारचे अर्ज आता आपले सरकार सेवा केंद्र, महा-ई-सेवा केंद्र या ठिकाणीही करता येणार.महसूल विभाग अंतर्गत केल्या जाणाऱ्या सर्व कामे कधीच एकावेळी होत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना एका कामासाठी खूप हेलपाटे मारावे लागत होते पण या सुविधेमुळे हेलपाटे मारणे थांबणार आहे.

Land Record:

फेरफार विषयक नोंदी,ज्या नोंदी दस्त  द्वारे होत नाहीत आणि केवळ अर्जद्वारे देखील करता येतात यासाठी राज्य सरकारने भूमी अभिलेख विभागाने ही प्रणाली सुरू केली आहे.त्यानुसार वारस नोंद करणे,मयताचे नाव कमी करणे, बोजा चढवणे किंवा कमी करणे अशा स्वरूपाच्या कामासाठी तलाठी कार्यालयात अर्ज देऊन या संदर्भात कारवाई करता येते नव्या निर्णयानुसार ही कामे देखील महा-ई-सेवा ,आपले सरकार सेवा केंद्र च्या माध्यमातून होणार आहेत.

सेवेचा लाभ कसे घेणार?

  • सेवा केंद्र मधून अर्ज व त्यासाठी लागणारे एक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे यासाठी केवळ २५ रुपये खर्च लागणार आहे.
  • अर्जदारांना अधिकच कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायचे असल्यास प्रत्येक कागदपत्र ला केवळ दोन रुपये खर्च करावा लागणार.
  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना अर्जदाराने स्वतःचा मोबाईल क्रमांक दिल्यास प्रक्रिया दरम्यान प्रत्येक स्तरावरील माहिती एसएमएस द्वारे कळवले जाणार.

महसूल विभागाच्या अंतर्गत ही ऑनलाईन प्रणालीचे जास्तीत जास्त उपयोग नागरिकांनी करून घ्यावा कोणतेही ऑनलाइन अर्ज करताना आपले मोबाईल क्रमांक नोंद करून घ्यावेत अशी माहिती, माहिती व तंत्रज्ञान भूमि अभिलेख विभाग पुणे,राज संचालक सरिता नारके  यांनी पत्रकारांना माहिती दिले.

👇👇👇👇

7/12,8अ,फेरफार,

ऑनलाइन बाबतGR

👉येथे चेक करा👈

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top