रब्बी पीक विमा २०२३ मध्ये १ रुपये भरून शेतकर्‍यांना सहभागाचे आवाहन | Pradhan Mantri Fasal Bima Yojana List

Rabbi Pik Vima 2023 :-

नमस्कार शेतकरी मित्रांनो ,राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप २०२३ ते रब्बी २०२५-२६ हंगामासाठी ३ वर्षासाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक (Area Approach) धरून राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.निसर्गाची कोप पिकानांवर कधी होईल हे सांगता येत नाही त्यासाठी शेतकर्‍यांनी या पीक विमा मध्ये सहभाग व्हावे.कृषि संचालक दिलीप झेंडे यांनी केले आहे.

crop Insurance Rabbi 2023 :- 

रब्बी हंगाम २०२३-२४ मध्ये राज्यातील कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकर्‍यांना ऐच्छिक असून योजनेत सहभाग घेण्याची अंतिम मुदत रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत) करिता ३० नोव्होबर २०२३ ,गहू (बागायत),हरभरा,रब्बी कांदा करिता १५ डिंसेबर २०२३ व उन्हाळी भात ,उन्हाळी भुईमूग पिकाकरीता ३१ मार्च २०२४ अशी आहे.त्यासाठी PMFBY ऑनलाइन पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे .

रब्बी पीक विमा (पिके) :- 

गहू (बागायत),रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत),हरभरा उन्हाळी भात ,उन्हाळी भुईमूग व रब्बी कांदा (६ पिके) या अधिसूचित पिकांसाठी पीक विमा काढता येणार.राज्य सरकार ने सन २०२३-२४ पासून “सर्वसमावेशक पीक विमा योजना “राबविण्याचा निर्णय राज्य शासनाचे घेतला आहे .या निर्णय प्रमाणे शेतकर्‍यांची हिश्याची विमा हप्ता राज्य शासन मार्फत भरलं जाणार आहे .

PMFBY Rabbi PIk Vima कागदपत्रे :- 

htttps://pmfby.gov.in  आधार कार्ड , जमीन ७/१२ उतारा ,स्वघोषणा पत्र ,इत्यादि

विमा भरण्यासाठी बँक किंवा आपले सरकार सेवा केंद्र (CSC) या ठिकाणी जाऊन भरू शकता .

रब्बी पीक विमा मध्ये सहभागी कंपनी :-
  • सोलापूर ,अहमदनगर ,नाशिक ,चंद्रपूर ,जळगाव ,सातारा या जिल्हाकरिता ओरींएन्टल इन्शुरान्स कं.लि
  • परभणी,वर्धा ,नागपूर ,या जिल्हासाठी ICICI लोंम्बार्ड जनरल  इन्शुरान्स कं.लि
  • जालना ,गोंदिया ,कोल्हापूर या जिल्हासाठी युनिव्हर्सल सोम्पो जनरल  इन्शुरान्स कं.लि

अश्या वेग वेगळ्या कंपण्याचा सहभाग या मध्ये आहे .

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top