Cm Kisan Yojana :-
नमस्कार शेतकरी मित्रांनो,राज्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पात्र लाभार्थ्यांची संख्या एकूण ८५.६६ लाख एवढी आहे.या शेतकऱ्यांना Pm Kisan Yojana चा १४ वा हप्ता प्राप्त झाला आहे. या योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे.महाराष्ट्रातील ८८.९२ लाख लाभार्थ्यांनी आपले बँक खाते आधार लिंक केले आहेत.Aadhar NPCI Link
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने सुरुवात केलेले नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता मिळवण्यासाठी राज्यातील या घडीला ८५.६६ लाख शेतकरी पात्र आहेत. शासनाने सुरू केलेल्या मोहिमेअंतर्गत राज्यातील नमो शेतकरी महा सन्मान योजना चे पात्रतेची संख्या वाढणार आहे. PM Kisan Yojana योजना व नमो शेतकरी योजना लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या बेनिफिश्री स्टेटस मध्ये या गोष्टी तपासावे लागणार, ते नेमके कोणते ? शेतकऱ्यांनी काय करावे यासंदर्भात सविस्तर माहिती या लेखात पाहणार आहोत.
Namo Shetkari MahaSanman Nidhi Yojana :-
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना चा १४ वा हप्ता नुकतेच वितरण झाला असून त्यासाठी राज्यातील ९७ लाख शेतकऱ्यांपैकी ८५.६६ लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाला. पण राज्यातील १२ लाख शेतकरी पात्र असून भूमी अभिलेख नोंद अद्यावत नसणे, ई-के वाय सी नसणे, बँक खाते आधार संलग्न नसणे ,या तीन कारणामुळे वंचित आहेत.अशा शेतकऱ्यांसाठी १५ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम हाती घेण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी त्या त्या विभागालाआदेश दिले आहेत.
नमो शेतकरी महा-सन्मान निधी योजना :-
या मोहिमेअंतर्गत प्रत्येक तालुका स्तरावर भूमी अभिलेख अधिकारी कृषी अधिकारी यांच्या सह नियंत्रण समिती स्थापन करण्यात आल्या असून त्यांच्या अंतर्गत गाव पातळीवर ग्रामसेवक तलाठी कृषी सेवक यांना वरील तीन अटीच्या लाभापासून वंचित राहिलेले शेतकऱ्यांना शोधून या तिन्ही अटीची पूर्तता करण्यात येणार आहे.
नमो शेतकरी महा सन्मान योजना च्या पहिला हप्ता वितरण करण्यापूर्वी केंद्राच्या योजनेतून वंचित राहणाऱ्या १२ लाख शेतकऱ्यांची अटी पूर्तता करण्याचे काम केले जाणार असल्याची माहिती कृषिमंत्री यांनी सांगितले.
शेतकरी मित्रांनो काही जिल्ह्यांमध्ये तालुका निहाय त्रुटी असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध केलेले आहेत. त्याकरिता आपल्या तलाठी यांना भेटा योग्य कागदपत्रे देऊन अटीची पूर्तता करून घ्या ही प्रक्रिया पूर्ण केल्यावरच नमो शेतकरी महा सन्मानित योजनेचा लाभ मिळणार आहे.
पी एम किसान योजनेच्या बेनिफिश्री हे पहा :-
👇👇👇👇