मतदारांच्या घरी जाणार निवडणूक अधिकारी ,हे सेवा घरपोच | Voter Registration 2023

Voter Registration 2023 :-

नमस्कार मित्रांनो, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि भारत निवडणूक आयोगाच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत राज्यात आजपासून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ घरी भेटी देऊन मतदारांची माहिती पडताळणी करून घेणार आहेत.राज्यात २१ जुलै २०२३ पासून ते २० ऑगस्ट २०२३ पर्यंत ही मोहीम राज्यात राबवली जाणार आहे. Voter id 

या मोहिमेंतर्गत बीएलओ गावातील प्रत्येक मतदारांची वैयक्तिक तपशील, पत्ता आणि छायाचित्राची पडताळणी करतील, मृत आणि स्थलांतरित मतदार, दुबार नोंदणी झालेल्या मतदार मतदारांची नोंद  घेतील,तसेच नागरिकांचे मतदान ओळखपत्र सोबत आधार कार्ड जोडणीची प्रक्रिया पूर्ण करतील.voter card link aadhar 

Voter id Apply :- 

जे प्रौढ मतदार आहेत त्यांचे नवीन मतदार नोंदणी मध्ये नोंद घेण्यात येईल, या एक महिन्याच्या मोहिमेअंतर्गत सर्व नवीन मतदार, जुने मतदारांचे असणारे त्रुटी पूर्तता करण्याचे काम बीएलओ (BLO)करणार आहेत.ज्यावेळी मतदार अधिकारी आपल्या घरी येतील त्यावेळी नागरिकांनी आपले स्वतःचे तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांचे नावे मतदार यादीत आहेत की नाही याची तपासणी करावी .घरातील ज्या व्यक्तींचे १८ वर्षे पूर्ण झाले आहेत.अजूनही मतदार नोंदणी केलेले नाही अशांची मतदार नोंदणी करून घ्यावी .voter id download 

मतदार यादीतील आपली वैयक्तिक माहिती तपशील पत्ता यात काही दुरुस्ती असतील तर त्याचा अर्ज भरून द्यावा लग्नानंतर नाव बदललेल्या स्त्रियांची मतदार यादी आपले नाव बदलून घ्यावी. स्थलांतर झालेल्या नि पत्त्याची नोंद करून घ्यावेत असे आव्हान करण्यात येत आहे .voter list 

ही मोहीम जर १०० % करायचे असल्यास सर्व मतदारांचे सहकार्याची गरज आहे. असे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले.

BLO च्या सहकाऱ्याने हे कामे नक्की करा !

कामे कोणती हे पहाण्यासाठी

👉🏿येथे क्लिक करा👈🏿

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top