Aadhaar Pan Link is not Done Due to Penalty :-
नमस्कार मित्रांनो, पॅन कार्ड ला आधार लिंक करण्याची मुदत ३० जून २०२३ रोजी समाप्त झाला आहे.दिलेल्या कालावधीमध्ये ज्यांनी पॅन कार्ड ला आधार लिंक केले नाहीत असे सर्व पॅन कार्ड आता निष्क्रिय करण्यात आले आहेत.अशा लोकांना खूप मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागणार. त्यांना आधार लिंक न केल्यामुळे कोण कोणते समस्यांना तोंड द्यावे लागते त्याकरिता आपण काय करावे यासंदर्भात सविस्तर माहिती या लेखात पाहणार आहोत.
Pan Aadhaar Link :-
आधार कार्ड आणि पॅन कार्ड दोन्ही लिंक करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून अनेक वेळा संधी देऊनही बरेचसे जण हे काम केले नाहीत.अशा लोकांना आता जबरदस्त दंड भरावा लागेल.ज्यांनी आधार कार्ड ला पॅन कार्ड लिंक नसताना हे पॅन कार्ड व्यवहारात वापरल्यास रुपये १० हजार इतके दंड भरावे लागणार आहे.
तुमचे पॅन कार्ड पुन्हा सक्रिय करण्यासाठी तुम्हाला १००० रुपये दंड भरून पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक करू शकता.आत्तापर्यंत १००० रुपये दंड का भरावे या भ्रमात जर असलेल्या नागरिकांना आता त्यांचा हा विचार त्यांच्या अंगलट येणार आहे.
Aadhaar Pan Link :-
इन्कम टॅक्स विभागाच्या नियमानुसार असे कोणकोणते व्यवहार आहेत की जे निष्क्रिय पॅन कार्ड साह्याने करता येणार नाही ते पहा !
इन्कम टॅक्स भरता येणार नाही :
सीबीडीटी नियमानुसार टॅक्स पेयर्स आयकर रिटर्न करू शकता पण १ जुलै २०२३ पासून निष्क्रिय झालेल्या पॅन कार्ड वापरून आयटीआर फाईल करता येणार नाही.
फिक्स डिपॉझिट,सेविंग अकाउंट :-
ज्यांनी पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक केले नाही.अशा व्यक्तींना कोणत्याही बँकेत बँक खाते उघडता येणार नाही किंवा को-ऑपरेटिव्ह बँकेत ५० हजार रुपये पेक्षा जास्त रक्कम जमा करता येणार नाही.
क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड :-
निष्क्रिय पॅन कार्ड असल्यास क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड साठी अर्ज करता येणार नाही
संपत्ती खरेदी विक्री :-
१० लाख रुपये वरील खरेदी विक्री व्यवहारास जास्तीचे टॅक्स द्यावे लागणार.
एवढे भरावे लागेल दंड :-
तुम्ही दंड वरून पॅन आधार कार्ड ला लिंक केलात म्हणजे तुमचे पॅन कार्ड सक्रिय होणार नाही ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी एकूण ३० दिवसाची कालावधी लागते, सध्या टॅक्स रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२३ आहे .ही मुदत तर संपली तर तुम्हाला ५००० हजार रुपये अतिरिक्त शुल्क भरावे लागणार एकूणचं पॅन आधारला लिंक न केले १००० रुपये, टॅक्स रिटर्न फाईल चे ५००० रुपये अशी एकूण ६००० रुपयांचा फटका बसणार.
एकूणच ज्या दिवशी तुम्ही पॅन आधारला लिंक कराल त्या दिवसापासून एक महिन्यानंतर ना आपले पॅन कार्ड सक्रिय होणार मगच टॅक्स रिटर्न फाईल करता येणार नेहमीप्रमाणे इतर आर्थिक व्यवहारी आपणास करण्यास मुभा.
पॅन आधार लिंक करण्यासाठी
👉🏿येथे क्लिक करा👈🏿