E Pik Pahani Online Maharashtra :-
नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने प्रत्यक्ष ई-पीक नोंदणी १५ ऑगस्ट २०२१ पासून राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.पीक पेरणी ची माहिती गाव नमुना नंबर १२ मध्ये नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांना मोबाईल ॲप उपलब्ध करून देण्यात आले, हे ॲप टाटा ट्रस्ट ने विकसित केले असून ई-पीक पाहणी या कार्यक्रमाची अंमलबजावणी राज्य, विभाग, जिल्हा आणि तालुका स्तरावर समिती गठीत करून करण्यात येत आहे . E Pik Pahani Online
ई पीक पाहणी ॲप डाउनलोड
👉🏿येथे क्लिक करा👈🏿
E Pik Nondani 2023 :-
मागील दोन वर्षापासून महाराष्ट्र राज्यामध्ये मोबाईल वरून ई-पीक पाहणी ची नोंदणी केली जात आहे यावर्षी खरीप हंगामाला सुरुवात झाल्यापासून
ही कारवाई पुन्हा कार्यान्वित केले आहे. ०१ जुलै २०२३ पासून ही नोंदणी सुरू झाली असून शेतकऱ्याने आपल्या खरीप हंगामातील पिकांची नोंदणी
या ई-पीक पाहणी मोबाईल ॲपच्या माध्यमातून करण्यास महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे.E-peek Pahani
शेतकर्यांने केलेल्या ई-पीक पाहणी द्वारे पुढे जाऊन पिक विमा चे दावे निकाली काढण्यासाठी, पिकांचे कर्ज वाटप,नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झालेले
भरपाई देण्यास सरकारला मदत होणार त्याकरिता ई-पीक पाहणी ची करणे गरजेचं आहे.शेतकऱ्याने नोंदविलेल्या पीक पाहणी नोंदणी ४८ तासांमध्ये एकदा
दुरुस्त करता येणार असल्याची माहिती ई-पीक पाहणी प्रकल्पाचे राज्य समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे यांनी दिली.
ई पीक पाहणी नोंद शासन निर्णय
👉🏿येथे क्लिक करा👈🏿
E Pik Pahani Report :-
राज्यामध्ये सन २०२१ मध्ये राज्य शासनाच्या भूमी अभिलेख व जमावबंदी आयुक्तालयाने ऑगस्ट महिन्यात शेतकरी पातळीवर ई-पीक पाहणी नोंदणीसाठी ॲप उपलब्ध करून दिले आहे.या ॲप साह्याने शेतकरी स्वतःहून आपल्या ७/१२ उतारावर आपल्या शेती पिकांची नोंद करता येणार आहे.यामुळे खरीप अथवा रब्बी हंगामातील पिकाची नोंद करण्यासाठी तलाठी कार्यालयास जाण्यास गरज नाही.भूमी अभिलेख विभागाने आता ई-पीक पाहणी नवीन ॲप उपलब्ध करून दिले आहे.त्यामध्ये एकदा ई-पीक पाहणी नोंद केल्यानंतर पुढील४८ तासात पुन्हा त्या पिकांची दुरुस्ती करता येणार आहे. महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत ०१ कोटी ६७ लाख शेतकऱ्यांनी या मोबाईलच्या साह्याने आपले पिकांची नोंद केली आहे गेल्या वर्षीच्या खरीप हंगामाच्या एकूण सरासरी पीक क्षेत्राची नोंदणी ९१% इतके आहे. या खरीप हंगामामध्ये ते ९९% पर्यंत जाईल अशी माहिती प्राप्त होत आहे .