Shabari Gharkul Yojana List 2023 | या नागरिकांना मिळणार १,०७,०९९ इतके घरकुल,GR आला

Shabari Gharkul Yojana List 2023 :-

नमस्कार मित्रांनो, शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता ग्रामीण भागाकरिता घरकुलाची उद्दिष्टे निश्चित करण्याबाबत महाराष्ट्र शासन मार्फत एक महत्त्वाचे शासन निर्णय दिनांक ०२ जून २०२३ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.Shabari Gharkul या योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्हा निहाय किती ? घरकुल उद्दिष्ट किती ?,योजनेसाठी कोण पात्र राहतील, जिल्हा निहाय कोटा किती संपूर्ण माहिती आजच्या या लेखात आपण पाहणार आहोत.

Shabari Gharkul Yojana List :-

राज्यातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वतःची घरे नाहीत अथवा जे अनुसूचित जमातीचे लोक, कुंडा, मातीच्या घरात, झोपडपट्ट्यांमध्ये किंवा तात्पुरते तयार केलेला निवारात राहतात अशा अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी वैयक्तिक लाभाची शबरी आदिवासी घरकुल योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची मागणी अनुसार सन २०२३-२४ या अर्थसंकल्पीय मध्ये तरतूद करून शबरी आदिवासी योजना २०२३ अंतर्गत घरकुलाची उद्दिष्टे निश्चित करण्यात आले  सन २०२३-२४ आर्थिक वर्षाकरिता जिल्हा ग्रामीण भागातील एकूण १,०७,०९९ घरकुल बांधण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.Shabari Gharkul 2023

शबरी घरकुल योजना उद्दिष्टे ? 

shabari Gharkul Yojana 2023 अंतर्गत राज्यातील अनुसूचीत जमातीच्या ज्या लोकांना कडे राहण्यासाठी पक्के घर नाही .आणि ते मातीच्या ,झोपडीत ,कच्चे विटा मातीचे घर ,निवारासाठी बनवलेल्या तात्पुरती झोपडीत राहतात .अशा पात्र लाभार्थ्यांना पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य सरकार कडून केली जाते .या घरकुल योजने अंतर्गत आदिवासी अनुसूचीत जमाती लाभार्थ्याला  १.२० लाख रुपये इतकी आर्थिक मदत मिळतं तसेच मनरेगा अंतर्गत लाभार्थी कुंटुंबाला रोजगार देखील उपलब्ध होतो . Maharashtra Gharkul Yojana

शबरी आदिवासी घरकुल योजना

२०२३-२४  बाबत GR जिल्हा निहाय कोटा पहा 

👉येथे क्लिक करा👈

शासन निर्णय :- 

शबरी आदिवासी घरकुल योजना अंतर्गत सन २०२१-२२ या आर्थिक वर्षा करिता ही उद्दिष्टे निश्चित करण्यासाठी शासन निर्णय घेण्यात आला होता .

दिनांक १६ जुलै २०२१ GR 👉येथे क्लिक करा👈  

या वेळी झालेल्या मंत्रीमंडळ बैठीकीत राज्यातील कोणत्या जिल्ह्यात किती शबरी आदिवासी घरकुल उद्दिष्टे असेल हे ठरविण्यात आले .

त्यानुसार सन २०२३ शासन GR निर्गमित करून जिल्हा निहाय घरकुल उद्दिष्टे प्रसिद्ध करण्यात आले आहे .

वरील दोन्ही GR डाउनलोड करून सविस्तर माहिती पहा .

शबरी आदिवासी घरकुल योजना

२०२२-२३  बाबत GR

👉येथे क्लिक करा👈

Shabari Gharkul Yojana लाभार्थी पात्रता ?:-

  • महाराष्ट्र राज्यातील अनुसूचीत जमाती प्रवर्गातील रहिवासी असावा .
  • वार्षिक उत्पन्न हे १ लाखाच्या आत असावे ग्रामीण भाग .
  • नगर परिषद १.५लाख व महानगरपालिकानांसाठी २ लाख आत असावे .
  • सद्य स्थितीला पक्के घर नसावे .
  • घरकुल बांधकामसाठी जागा गावठाण मधील असावी .
  • या योजनेसाठी दिव्यांग या प्रथम प्राधान्य दिले जात .
  • दुर्गम भागातील आदीवासी ,विधवा या लाभर्थ्यांना अधिक प्राधान्य देण्यात येत .

शबरी घरकुल योजना आवश्यक कागदपत्रे ? 

  1. ग्रामपंचायत ठराव (प्रोसडिंग बूक ) नक्कल वर वेळ दिनांकसह ग्रामसेवक /सरपंच यांचा स्वाक्षरी व शिक्यासह असावा .
  2. अर्जदार लाभार्थी यांचे मा.उपविभागीय अधिकारी यांचे स्वाक्षरी असलेले जातीचे प्रमाणपत्र असावे .
  3. तहसिलदार यांच्या स्वाक्षरी असलेला उत्पन्नाचा दाखला (आर्थिक वर्षा प्रमाणे)
  4. रेशन कार्ड लाभार्थी
  5. दुबार लाभाचे प्रमाणपत्र हे ग्रामसेवक यांच्या लेटर पेज वर
  6. शवारी घरकुल अर्ज मागणीचा ,
  7. लाभार्थी जागेचा उतारा ८ अ असावा
  8. रहिवासी प्रमाणपत्र तहसिलदार यांच्या स्वाक्षरी असलेला.
  9. आधार कार्ड
  10. बँक पासबूक
  11. जॉब कार्ड

वरील सर्व कागदपत्रासह शबरी आदिवासी घरकुल योजनेचा प्रस्ताव ग्रामसेवक मार्फत पडताळणी करून पंचायत समिती कडे सादर करावा लागतो .

शबरी आवास योजनेबाबत संपर्क कोठे करावे ? 

शबरी आवास योजना करिता अधिक महितीसाठी मा.प्रकल्प अधिकारी ,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प .(जो जिल्ह्याच्या ठिकाणी असतो )या ठिकाणी संपर्क करावे या योजने बदल जिल्हा निहाय सविस्तर माहिती मिळेल .

शबरी आदिवासी घरकुल योजना

सविस्तर जाणून घ्या

👉येथे क्लिक करा👈

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top