New Parliament Building | नवीन संसद भवन भारताला मिळाला,७५ रुपयांचं खास नाण,काय आहे या नाण्याचं वैशिष्ट्ये ?

New Parliament Building :-

देशाला नवीन संसद भवन ची खूप प्रतीक्षा होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi)यांच्या हस्ते आज २८ मे २०२३ रोजी नवीन संसद भवन चे उद्घाटन करण्यात आले.याचं सोहळ्या निमित्त अर्थमंत्रालयाकडून अजून एक मोठा निर्णय घेण्यात आला.या नवीन संसद भवनाच्या उद्घाटन वेळी अर्थमंत्रालय ७५ रुपयाचे विशेष नाणं लॉन्च केलं आहे. आजच्या नवीन संसद भवनाचे वैशिष्ट्ये काय ? ७५ रु.नाणं नेमकं कसं असणार त्याचे खास वैशिष्ट्ये काय आहेत 75 Rupee Coin यासंदर्भात सविस्तर माहिती आजच्या या लेखात आपण पाहणार आहोत.

Special 75 Rupee Coin :-

मित्रांनो,भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झालेत त्यानिमित्ताने भारतीय अर्थ मंत्रालयामार्फत (Ministry Of Finance) ७५ रुपयाचं विशेष नाणे आजच्या दिवशी लॉन्च करण्यात आला आहे. नाणं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये रुपयाचे चिन्ह देखील असणार आहे .अंकामध्ये ७५असे लिहिलेले असेल,७५ रुपयांच्या नाण्याच्या एका बाजूला “अशोक स्तंभ”असेल त्याखाली सत्यमेव जयते असे लिहिलेले असेल त्याच्या डावीकडे देवनागरी लिपीत भारत आणि उजवीकडे इंग्रजीत इंडिया लिहिलेले असेल ७५ रुपयाचं नाणे हे ४४ मिमी व्यासाचे गोलाकार असेल

या नाण्याचं अजून एक खास वैशिष्ट्य म्हणजे या नाण्यावर नवीन संसद इमारतीचे देखील प्रतिमा असेल त्यामध्ये एका बाजूला हिंदीत संसद संकुलन आणि खालच्या बाजूस इंग्रजीमध्ये पार्लमेंट कॉम्प्लेक्स लिहिलेला असेल.अर्थ मंत्रालयामार्फत हे नाणं चार धातूपासून तयार केले जाणार त्यामध्ये ५०%  चांदी,४०%तांबे,०५टक्के निकेल आणि ०५ टक्के झिंक असेल .एकूणचं हा ७५ रुपये नाण्याचं वजन हे ३५ ग्रॅम असणार आहे.

मित्रांनो भारत सरकारच्या माध्यमातून कोलकत्ता येथील टांकसाळीत तयार करण्यात येणार आहे. या नाण्यावरील संसद परिसराच्या प्रतिमेच्या खालील २०२३ वर्षे कोरले जाईल .ही या नाण्याची रचना राज्यघटनेच्या पहिल्या अधिसूचीमध्ये दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार तयार केलेले असणार.

New Parliament Building :- 

मित्रांनो,नवीन संसद भवन बांधण्यासाठी एकूण २८ महिन्याचा कालावधी लागलेला आहे.याचं काम १० डिसेंबर २०२० ला सुरुवात करण्यात आला होता.याचं नवीन संसद भवन इमारतीचा उद्घाटन सोहळा २८ मे २०२३ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला.

नवीन संसद भवन मध्ये विशेष काय ? 

नवीन संसद भवन एकूण ६४,५०० वर्ग मीटर बांधकाम असून एकूण ०४ मजले हा संसद भवन आहे. त्यामध्ये ०३ मुख्य दरवाजे आहेत,

ज्ञान द्वार,शक्ती द्वार,कर्म द्वार,असे नाव देण्यात आलेत,यामध्ये प्रत्येकांचा प्रवेश करण्याचा दरवाजा वेगवेगळे आहे.त्यामध्ये VIPS साठी वेगळा दरवाजा आहे.हा संसद भवन जुन्या संसद भवना पेक्षा १७०००  वर्ग मीटर ने जास्त आहे .या नवीन संसद भवन भूकंपाचा धोका या इमारतीस होणार नाही.

संसद भवन बैठक व्यवस्था :- 

जुन्या संसद भवन मधील बैठक व्यवस्था लोकसभा मध्ये ५५० व  राज्यसभा मध्ये २५० सदस्यांची बैठक व्यवस्था आहे.

मित्रांनो नवीन संसद भवनामध्ये लोकसभा मध्ये ८८८ संसदी सदस्य बसण्याची व्यवस्था तर राज्यसभा मध्ये ३८४ सदस्य बसण्याची व्यवस्था आहे.दोन्ही भवनाचे संयुक्तरीत्या बैठकी व्यवस्था ही या नवीन संसदी इमारतीमध्ये करण्यात आला आहे .

यामध्ये एकूण १२८० संसद सदस्य बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे संसदीय सदस्यांसाठी या नवीन इमारतीमध्ये ग्रंथालय, जेवणाची व्यवस्था असलेला हॉल, नियोजित बैठक व्यवस्था मीटिंग हॉल,या नवीन इमारती खास वैशिष्ट्य म्हणजे संविधान हॉल या हॉलमध्ये संविधानाचे कॉपी या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे.या संविधान हॉलमध्ये थोर व्यक्तींचे फोटो सह माहिती या ठिकाणी लावले जाणार आहेत .

Why India Needed A New Parliament ? 

सध्या स्थितीला असलेला जुनी संसद भवन १९२७ मध्ये बांधलेला आहे.आता या इमारतीचा वय १०० वर्षा पर्यंत आहे.त्याचं बरोबर सदस्यांना बसण्यासाठी ही अडचणी होते जुनी इमारत असल्यामुळे आधुनिक तंत्रज्ञाना पासून वंचित हा इमारत आहे. नवीन संसद भवन खूप सारे तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे .

ही इमारत बांधण्यास किती खर्च ? 

नवीन संसद बांधण्याचा टेंडर हा “टाटा कंट्रक्शन” ला सन २०२० रोजी सोपवण्यात आला होता.सुरुवातीच्या काळात हा संसद भवन तयार करण्यासाठी ८६१ करोड रुपयांची आवश्यकता होती पण काही अतिरिक्त तंत्रज्ञानचा वापर केल्यामुळे यांची किंमत १२०० करोड रुपये पर्यंत झाले .

एकूणचं भारताला १२०० करोड रुपयांचा नवीन संसद भवन मिळाला आहे .संसद भवन आणि ७५ रुपये नाणं संदर्भाचं हा पोस्ट आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.  धन्यवाद !

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top