Mahadbt Farmer Seed Application 2023 :-
नमस्कार शेतकरी मित्रांनो,राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजना अंतर्गत Mahadbt Portal च्या माध्यमातून या वर्षीही खरीप हंगाम २०२३,कृषी विभागांतर्गत खरीप पिकांचे बियाणे खरेदी करण्यासाठी अनुदान मिळणार,ऑनलाईन अर्ज सुरू.शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात.
अशा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना फक्त महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाईन अर्ज करावे लागते.महा-डीबीटी पोर्टल वरती अनुदानावर बियाणे घेण्यासाठी व प्रात्यक्षिक अंतर्गत बियाणे वितरण साठी खरीप हंगाम २०२३ साठी अर्ज स्वीकारणे सुरू झाले आहे. या ठिकाणी बियाणे सुद्धा दिली जातात किंवा घेण्यासाठी अनुदान दिले जाते. शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टल वरती अर्ज करणे गरजेचे आहे.Mahadbt Biyane Anudan
Mahadbt Biyane Anudan Yojana : –
खरीप हंगाम २०२३ बियाणे अनुदान मध्ये,मका,तूर,मूग,उडीद,सोयाबीन,नाचणी इत्यादी पिकांच्या बियाण्याकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी ,आधार कार्ड झेरॉक्स,बँक पासबुक झेरॉक्स,शेत जमिनीचा ७/१२, ८अ उतारा इत्यादी कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
महाडीबीटी पोर्टल वरती आपले लॉगिन आयडी उपलब्ध असल्यास त्याचं आयडी वरती लॉगिन करून बियाणे अनुदानाकरिता अर्ज करू शकता.किंवा जवळचे आपले सरकार सेवा केंद्र, महा-ई-सेवा केंद्र,ऑनलाइन सुविधा देणारे मल्टीसर्विसेस केंद्र या ठिकाणी जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता .या बियाणे अनुदाना करिता अधिक माहितीसाठी आपल्या तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी सेवक यांना संपर्क साधा .Biyane Anudan Yojana 2023
MahaDBT आवश्यक कागदपत्रे