शबरी आदिवासी घरकुल योजना उद्दिष्टे,अनुदान,पात्रता,कागदपत्रे ,अर्ज | Shabari Gharkul Yojana 2023

शबरी आदिवासी घरकुल योजना :- 

नमस्कार मित्रांनो ,आदिवसी उपयोजने अंतर्गत राज्यातील अनुसूचीत जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वत:ची घरे नाहीत अथवा जे अनुसूचीत जमातीचे लोक मातीच्या घरात ,झोपड्यामध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवारात राहतात अशा अनुसूचीत जमातीतील पात्र,लाभार्थ्यांना ,घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी वैयक्तिक लाभाची शबरी आदिवासी घरकुल योजना हा महत्वपूर्ण राबविली जाते .Maharashtra Gharkul Yojana याचं घरकुल योजना उद्दिष्टे ,अनुदान,पात्रता ,कागदपत्रे ,अर्ज कोठे करायचं या बदलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत,तरी हा लेख संपूर्ण वाचा .  

Shabari Gharkul Yojana 2023 :-

शबरी आदिवासी घरकुल योजना अंतर्गत पात्र लाभर्थ्यांना २६९ चौरस फुट क्षेत्र असलेले पक्के घरकुल बांधण्यासाठी आर्थिक मदत दिले जाते .राज्य शासन मार्फत  करण्यात आलेले सन २०११ च्या सर्वेक्षणांनुसार या योजनेस पात्र अनुसूचीत जमातीतील लाभार्थ्यांनासाठी स्वछ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधण्यासाठी स्वतंत्र आर्थिक मदत देण्याची तरतूद देखील आहे .मित्रांनो ही योजना फक्त अनुसूचीत जमातीतील नागरिकांनासाठी आहे या योजनेसाठी पात्र लाभार्थ्याची निवड करताना ग्रामसभा,पंचायत समिति,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या सर्व ठिकाणी योग्य तपासणी ,कार्यवाही करून मंजूरी देण्यात येते .

शबरी घरकुल योजना उद्दिष्टे ? 

shabari Gharkul Yojana 2023 अंतर्गत राज्यातील अनुसूचीत जमातीच्या ज्या लोकांना कडे राहण्यासाठी पक्के घर नाही .आणि ते मातीच्या ,झोपडीत ,कच्चे विटा मातीचे घर ,निवारासाठी बनवलेल्या तात्पुरती झोपडीत राहतात .अशा पात्र लाभार्थ्यांना पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य सरकार कडून केली जाते .या घरकुल योजने अंतर्गत आदिवासी अनुसूचीत जमाती लाभार्थ्याला  १.२० लाख रुपये इतकी आर्थिक मदत मिळतं तसेच मनरेगा अंतर्गत लाभार्थी कुंटुंबाला रोजगार देखील उपलब्ध होतो . Maharashtra Gharkul Yojana

शबरी आदिवासी घरकुल योजना

२०२२-२३  बाबत GR

👉येथे क्लिक करा👈

शासन निर्णय :- 

शबरी आदिवासी घरकुल योजना अंतर्गत सन २०२१-२२ या आर्थिक वर्षा करिता ही उद्दिष्टे निश्चित करण्यासाठी शासन निर्णय घेण्यात आला होता .

दिनांक १६ जुलै २०२१ GR 👉येथे क्लिक करा👈  

या वेळी झालेल्या मंत्रीमंडळ बैठीकीत राज्यातील कोणत्या जिल्ह्यात किती शबरी आदिवासी घरकुल उद्दिष्टे असेल हे ठरविण्यात आले .

त्यानुसार सन २०२३ शासन GR निर्गमित करून जिल्हा निहाय घरकुल उद्दिष्टे प्रसिद्ध करण्यात आले आहे .

वरील दोन्ही GR डाउनलोड करून सविस्तर माहिती पहा .

Shabari Gharkul Yojana लाभार्थी पात्रता ?:-

  • महाराष्ट्र राज्यातील अनुसूचीत जमाती प्रवर्गातील रहिवासी असावा .
  • वार्षिक उत्पन्न हे १ लाखाच्या आत असावे ग्रामीण भाग .
  • नगर परिषद १.५लाख व महानगरपालिकानांसाठी २ लाख आत असावे .
  • सद्य स्थितीला पक्के घर नसावे .
  • घरकुल बांधकामसाठी जागा गावठाण मधील असावी .
  • या योजनेसाठी दिव्यांग या प्रथम प्राधान्य दिले जात .
  • दुर्गम भागातील आदीवासी ,विधवा या लाभर्थ्यांना अधिक प्राधान्य देण्यात येत .

शबरी घरकुल योजना आवश्यक कागदपत्रे ? 

  1. ग्रामपंचायत ठराव (प्रोसडिंग बूक ) नक्कल वर वेळ दिनांकसह ग्रामसेवक /सरपंच यांचा स्वाक्षरी व शिक्यासह असावा .
  2. अर्जदार लाभार्थी यांचे मा.उपविभागीय अधिकारी यांचे स्वाक्षरी असलेले जातीचे प्रमाणपत्र असावे .
  3. तहसिलदार यांच्या स्वाक्षरी असलेला उत्पन्नाचा दाखला (आर्थिक वर्षा प्रमाणे)
  4. रेशन कार्ड लाभार्थी
  5. दुबार लाभाचे प्रमाणपत्र हे ग्रामसेवक यांच्या लेटर पेज वर
  6. शवारी घरकुल अर्ज मागणीचा ,
  7. लाभार्थी जागेचा उतारा ८ अ असावा
  8. रहिवासी प्रमाणपत्र तहसिलदार यांच्या स्वाक्षरी असलेला.
  9. आधार कार्ड
  10. बँक पासबूक
  11. जॉब कार्ड

वरील सर्व कागदपत्रासह शबरी आदिवासी घरकुल योजनेचा प्रस्ताव ग्रामसेवक मार्फत पडताळणी करून पंचायत समिती कडे सादर करावा लागतो .

शबरी आवास योजनेबाबत संपर्क कोठे करावे ? 

शबरी आवास योजना करिता अधिक महितीसाठी मा.प्रकल्प अधिकारी ,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प .(जो जिल्ह्याच्या ठिकाणी असतो )या ठिकाणी संपर्क करावे या योजने बदल जिल्हा निहाय सविस्तर माहिती मिळेल .

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top