50,000 रु. प्रोत्साहन अनुदान हे शेतकरी अपात्र | 50,000 Protsahan Anudan Yojana Maharashtra

50,000 रु. प्रोत्साहन अनुदान हे शेतकरी अपात्र :-

नमस्कार शेतकरी मित्रांनो , ५०,००० रुपये प्रोत्साहनपर अनुदान सर्व जिल्ह्याच्या याद्या आहेत ते त्या प्रसिद्ध झालेले आहेत या याद्या तुम्हाला तुमच्या गावातील आपले सरकार सेवा केंद्र (csc center) त्यांच्याकडे भेटेल .जे शेतकरी नियमित पिक कर्ज गेलेले आहेत 50000 protsahan anudan yojana list त्यांचे नाव आज महाराष्ट्र शासनाकडून जाहीर केलेल्या आहेत, या लिस्टमधील शेतकरी सन २०१७-१८,२०१८-१९ व २०१९-२० या आर्थिक वर्षामध्ये किमान २ वर्षे पीक कर्जाची परतफेड वेळेवर केलेल्या आहेत 50000 anudan yojana maharashtra list अशा शेतकऱ्यांना हे प्रोत्साहनपर अनुदान दिले जात आहे, यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नाव आहेत त्या शेतकऱ्याने आपल्याजवळील सीएससी सेंटर वर जाऊन  केवायसी करणे बंधनकारक आहे,

E-kyc कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • कर्ज खाते व बचत खाते पासबुक
  • यादीमध्ये असलेला तुमचा विशिष्ट क्रमांक
  • शेतकरी मित्रांनो लिस्ट मध्ये असलेले नावांमध्ये विसगत असल्यास तुम्ही केवायसी करताना या पोर्टलच्या साह्याने तक्रार नोंदवू शकता,

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा टीप :

आता जाहीर केलेली यादी ही अंतिम यादी नसून बँकेकडून जशी माहिती उपलब्ध होईल त्याप्रमाणे नवीन कर्ज खाते ची यादी शासनाकडून

प्रसिद्ध केला जाणार आहे.

निकष  :

या योजनेस वैयक्तिक शेतकरी गृहीत धरले जाणार  या योजनेसाठी केवळ राष्ट्रीयीकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व घरी सेवा सहकारी संस्थांनी( बँकेकडून कर्ज घेऊन किंवा स्वनिधीतून) शेतकऱ्यांना दिलेल्या अल्पमुदत पीक कर्ज विचारात घेतले आहे. सन २०१९ वर्षांमध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झालेल्या नैसर्गिक आपत्ती अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना सुद्धा सदर योजनेस पात्र असतील. तसेच एखादा शेतकरी मयत झाल्यानंतर त्याच्या वारसांनी कर्जाची परतफेड केली असल्यास वारसा सुद्धा प्रोत्साहनपर योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील..

५०,००० रु.प्रोत्साहन अनुदान अधिक माहितीसाठी

येथे  क्लिक करा

 

सदर योजनेस पात्र नसलेले शेतकरी :

  • महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्ती योजना २०१९ अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी.
  • राज्यातील आजी/ माजी मंत्री/ राज्यमंत्री, आजी/ माझी लोकसभा/ राज्यसभा सदस्य, आजी/ माझी विधानसभा/ विधानपरिषद सदस्य,
  • केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी/ कर्मचारी( एकत्रित मासिक वेतन रुपये २५००० पेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्थश्रेणी कर्मचारी वगळून)
  • राज्यात सार्वजनिक उपक्रम( उदारणार्थ महावितरण, एसटी महामंडळ इत्यादी) व अनुदानित संस्था यांचे अधिकारी व कर्मचारी( एकत्रित मासिक वेतन रुपये २५००० जास्त असणारे मात्र चतुर्थ-श्रेणी-कर्मचारी वळून)
  • शेतीमध्ये उत्पादन व आयकर भरणारे व्यक्ती
  • सेवानिवृत्त व्यक्ती, रुपये २५  हजार पेक्षा जास्त निवृत्ती वेतन( माजी सैनिक वगळून)
  • कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकार कारखाना, सहकारी बँक,, जिल्हा मध्यवर्ती बँक सहकारी दूध संघ ( पंचवीस हजारापेक्षा जास्त असणारे) व पदाधिकारी( अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ)

शेतकरी मित्रांनो वरील शासनाच्या नियम व अटी मध्ये आपण या ५०,००० रुपये प्रोत्साहनपर अनुदान लाभ योजनेस आपण पात्र आहात का ह्याची खात्री तुम्हाला झाली असेल, योजनेसंदर्भात हा महत्त्वपूर्ण लेख तुम्हाला जर आवडला असेल तरी इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top