50,000 Anudan Yojana Maharashtra List 2022 | 50,000 रु प्रोत्साहन अनुदान

Niyamit karj Mafi 2022 Maharashtra List,Mahatma Pule karj mafi yojana 2022 list,Niyamit Karj Mafi list,50,000 Anudan Yojana Maharashtra

50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान योजनेचे तपशील :

  1. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना असे संबोधण्यात येईल.
  2. राज्यातील नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन २०१७-१८ ,
  3. सन २०१८-१९ आणि २०१९-२० या आर्थिक च्या  कालावधीमध्ये जे शेतकरी आपले पिक कर्ज नियमित परतफेड केलेले आहेत तेचं
  4. शेतकरी या योजनेस पात्र राहतील. Niyamit kar mafi yojana

कर्ज परतफेड केलेले ग्राह्य कालावधी :

  • सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात अल्प मुदत पिक कर्ज दिनांक ३० जून २०१८ पर्यत भरलेले शेतकरी .
  • सन २०१८-१९ या वित्तीय वर्षामध्ये अल्पमुदत पीक कर्ज ३० जून २०१९ पर्यंत परतफेड केलेले असल्यास.
  • सन २०१९-२० या वित्तीय वर्षात घेतलेला अल्पमुदत पीक कर्ज दिनांक ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत पूर्णत परतफेड केलेले असल्यास .
  • अथवा सन २०१७-१८,२०१८-१९ व २०१९-२० या तिन्ही वित्तीय वर्षात बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पिक कालावधीनुसार
  • कर्ज परत फेड येते दिनांक यापैकी जी नंतर असलेली दिनांक असेल त्या दिनांका पूर्वी त्याची पण परतफेड केलेले असल्यास.
  • अशा शेतकऱ्यांना सन २०१८-१९, अथवा सन२०१९-२० या वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्ज चा मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त ५० हजार रुपये पर्यंत प्रोत्साहनपर पर लाभ म्हणून देण्यास मान्यता देण्यात आली.
  • ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज ५०,००० रुपयापेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन २०१८-१९ अथवा सन २०१९-२० या वर्षात प्रत्यक्ष घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज च्या मुदला इतकेच प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय :

  1. या योजनेचा लाभ देताना वैयक्तिक शेतकरी विचारात घेऊन त्यांनी एक/ अनेक बँकाकडून घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड एकत्रित रक्कम विचारात घेऊन रुपये ५० हजार कमाल प्रोत्साहनपर लाभ रक्कम निश्चित करण्यात आले.
  2. प्रोत्साहनपर अनुदानाची अंमलबजावणी ऑनलाइन पद्धतीने राबवले जाणार.

कर्जमुक्ती योजनेसाठी निकष:

  1. या योजनेस वैयक्तिक शेतकरी गृहीत धरले जाणार.
  2. या योजनेसाठी केवळ राष्ट्रीयीकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व नागरी सेवा सहकारी संस्थांनी (बँकेकडून कर्ज घेऊन किंवा स्वनिधीतून) शेतकऱ्यांना दिलेल्या अल्पमुदत पीक कर्ज विचारात घेतले आहे.
  3. सन २०१९ वर्षांमध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झालेल्या नैसर्गिक आपत्ती अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना सुद्धा सदर योजनेस पात्र असतील. तसेच एखादा शेतकरी मयत झाल्यानंतर त्याच्या वारसांनी कर्जाची परतफेड केली असल्यास वारसा सुद्धा प्रोत्साहनपर योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील..

सदर योजनेस पात्र नसलेले व्यक्ती:

  1. महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्ती योजना २०१९ अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी.
  2. राज्यातील आजी/ माजी मंत्री/ राज्यमंत्री, आजी/ माझी लोकसभा/ राज्यसभा सदस्य, आजी/ माझी विधानसभा/ विधानपरिषद सदस्य,
  3. केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी/ कर्मचारी( एकत्रित मासिक वेतन रुपये २५००० पेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्थश्रेणी कर्मचारी वगळून)
  4. राज्यात सार्वजनिक उपक्रम( उदारणार्थ महावितरण, एसटी महामंडळ इत्यादी) व अनुदानित संस्था यांचे अधिकारी व कर्मचारी (एकत्रित मासिक वेतन रुपये २५००० जास्त असणारे मात्र चतुर्थ-श्रेणी-कर्मचारी वळून)
  5. शेतीमध्ये उत्पादन व आयकर भरणारे व्यक्ती
  6. सेवानिवृत्त व्यक्ती, रुपये २५ हजार पेक्षा जास्त निवृत्ती वेतन( माजी सैनिक वगळून)
  7. कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकार कारखाना, सहकारी बँक,, जिल्हा मध्यवर्ती बँक सहकारी दूध संघ ( पंचवीस हजारापेक्षा जास्त असणारे) व पदाधिकारी        ( अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ)

शेतकरी मित्रांनो वरील शासनाच्या नियम व अटी मध्ये आपण या ५०,००० रुपये प्रोत्साहनपर अनुदान लाभ योजनेस आपण पात्र आहात का ह्याची खात्री तुम्हाला झाली असेल, योजनेसंदर्भात हा महत्त्वपूर्ण लेख तुम्हाला जर आवडला असेल तरी इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद!

महाराष्ट्र शासन निर्णय GR पहाण्यासाठी येथे क्लिक करा .

error: Content is protected !!
Scroll to Top