५०,००० रु.प्रोत्साहन अनुदान यादी मध्ये का नाही आलं तुमचं नांव | 50000 protsahan Anudan Yojana Maharashtra list

५०,००० रु प्रोत्साहन अनुदान यादी मध्ये का नाही आलं तुमचं नांव :- 

नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत करतो तुमचं MH-शेती या वेबसाईटवर, महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना-२०१९ च्या अंतर्गत राज्यातील नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ म्हणून ५०,००० रुपये अनुदान दिले जात आहे.या अनुदानाची पहिली यादी १३ऑक्टोंबर २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे.

ही पहिली यादी जाहीर झाल्यानंतर जे शेतकरी नियमित कर्ज भरणारे आहेत अशा बऱ्याच शेतकऱ्यांचे नाव यादीमध्ये नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एकच चर्चा चालू आहे की कोणत्या निकषावर मार्फत आपली नावं कमी झाले, आणि आपले नाव पुढील यादीमध्ये येणार की नाही,.

आणि आपण या योजनेस पात्र आहोत की नाही अशा बऱ्याच प्रश्नां च्या चर्चेला उधाण आले आहे आजच्या या लेखांमधून शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी शासनाने निर्गमित केलेल्या नियम व अटी बाबत माहिती पाहणार आहोत त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना-२०१९

महाराष्ट्र राज्यात पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या एकूण १५३ लाख शेतकरी आहेत. हे सर्व शेतकरी राज्यातील जे व्यापारी बँक,

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्याकडून कर्ज घेतले असून. राज्यात महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्ती योजना शासनाने

या कारणासाठी जाहीर केला होता .

५०,००० रु प्रोत्साहन अनुदान : –

सन २०१५-१६ ते २०१८-१९ या सलग चार वर्षाच्या आर्थिक कालावधीमध्ये राज्यामध्ये दुष्काळसदृश परिस्थिती होत.त्यावर्षी ५० पैसे पेक्षा कमी पैसेवारी जाहीर  करण्यात आली होती .राज्यात काही भागात अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांचा खूप मोठा नुकसान झाले होते. अशा विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांनी

मुदतीमध्ये परतफेड होऊ शकले नाही .परिणामी शेतकरी वर्ग पिक कर्ज थकबाकीदार झाले तद्नंतर शेती काम करताना नवीन पीक कर्ज घेण्यास

शेतकऱ्यांना अडचणी निर्माण झाले .या उपरोक्त सर्व विषयांचा विचार करून महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांसाठी हिवाळी अधिवेशन २०१९ मध्ये

” महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना जाहीर केली होती .

” या योजनेअंतर्गत अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रुपये ५०००० हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या घोषणा सन २०२० वीस च्या अर्थसंकल्प अधिवेशनात करण्यात आली होती. अधिवेशनानंतर सन २०२० पासून संपूर्ण देशात व राज्यात उद्भवलेला कोवीड-१९ या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक घडी विस्कटली याने हा प्रोत्साहनपर लाभ देण्यास शासन असमर्थ ठरला.

त्यानंतर सन २०२२ च्या अर्थसंकल्पीय मध्ये पुन्हा अल्प मुदतीत पिक कर्ज नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५०,००० रुपये प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन २०२२-२३ या वित्तीय वर्षात अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची घोषणा करण्यात आली. या घोषणेनंतर अनुदानास पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी महाराष्ट्र शासनामार्फत १३ ऑक्टोंबर २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे.

महाराष्ट्र शासन निर्णय :

२७/०७/२०२२ रोजीच्या झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्यातील शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना -२०१९ अंतर्गत

प्रोत्साहनपर रुपये ५०,००० हजार देण्याचे ठरले.

प्रोत्साहन अनुदानसाठी तुम्ही पात्र आहात हे जाणून घेण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top